ICC World Cup 2019: वर्ल्ड कप ट्रॉफीविषयी हे तुम्हाला माहिती आहे का?

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 16, 2019 | 14:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

ICC World Cup 2019: वर्ल्ड कप ट्रॉफीविषयी काही रंजक गोष्टीदेखील आहेत. त्या सगळ्याच क्रिकेटप्रेमींना माहिती आहेतच असे नाही. विजेत्या टीमला मूळ ट्रॉफी न देता नकली ट्रॉफी दिली जाते हे आजही अनेकांना माहिती नाही.

ICC Cricket World Cup Trophy
आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप ट्रॉफी   |  फोटो सौजन्य: YouTube

लंडन : येत्या ३० मे रोजी इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी जगभरातील सगळ्याच टीमनी कंबर कसली आहे. प्रत्येक टीम आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करून वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलण्याच्या प्रयत्नात असेल. या वर्ल्ड कपची फायनल १४ जुलैला होणार आहे. लॉर्डसवर होणाऱ्या फायनलनंतर कोणती टीम वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावणार याची उत्सुकता लागली आहे. पण, या विजेत्यांइतकीच त्या ट्रॉफीचीही उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागलेली असते. या ट्रॉफीविषयी काही रंजक गोष्टीदेखील आहेत. त्या सगळ्याच क्रिकेटप्रेमींना माहिती आहेतच असे नाही. वर्ल्ड कप विजेत्या टीमला मूळ ट्रॉफी न देता नकली ट्रॉफी दिली जाते हे अनेकांना माहिती नाही. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल अर्थात आयसीसी आपल्याकडे मूळ ट्रॉफी सांभाळून ठेवते. या गोष्टीसारख्या अनेक रंजक गोष्टी या ट्रॉफीशी जोडल्या गेलेल्या आहेत.

आयसीसीने घेतला निर्णय

वर्ल्ड कपच्या या ट्रॉफीविषयी उत्सुकता वाढवणारे अनेक विषय आहेत. त्यात सर्वांत महत्त्वाचा म्हणजे, ही ट्रॉफी तयार कशी केली जाते? ट्रॉफी हाताने तयारी केली जाते की त्याचा एक साचा आहे? या विषयी खूप उत्सुकता आहे. मुळात जेव्हापासून क्रिकेट वर्ल्ड कप सुरू झाला तेव्हापासून या ट्रॉफीला वेगवेगळा इतिहास आहे. ट्रॉफीचा प्रवास त्या त्या वर्षातील परिस्थितीनुसार झाला आहे. मुळात क्रिकेटच्या इतिहासात वन-डे वर्ल्ड कपला १९७५ मध्ये सुरूवात झाली. सुरूवातीच्या १९७५, १९७९ आणि १९८३ या तिन्ही वर्ल्डकपमध्ये मुख्य स्पॉन्सर प्रूडेंशियल पीएलसी होते. त्यामुळे ट्रॉफीचे डिझाइन एकच होते. पण, त्यानंतर पुढे स्पॉन्सर बदलतील तशी वर्ल्ड कपची ट्रॉफीही बदलत गेली. पण, १९९९मध्ये आयसीसीनं ट्रॉफी संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि ट्रॉफीचे स्वरूप बदलेले. स्पर्धेचा स्पॉन्सर कोणीही असला तरी विजेत्याला आपली ट्रॉफी देण्याचा निर्णय आयसीसीने घेतला.

ट्रॉफीचे वजन ११ किलो

इंग्लंडमध्ये झालेल्या १९९९च्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला आयसीसीची ट्रॉफी देण्यात आली. लंडनमध्ये गैरार्ड एन्ड को (क्राउन ज्वेलर्स) या कंपनीच्या कारागिरांनी एक डिझाइन तयार केलं होतं. तब्बल दोन महिन्यांच्या पूर्ण प्रक्रियेनंतर ट्रॉफी तयार झाली. सध्याची ट्रॉफी सोने आणि चांदीपासून बनवली जाते. तीन चांदीच्या कॉलमवर सोन्याचा बॉल ठेवला जातो. ट्रॉफीचे वजन जवळपास ११ किलो असते आणि त्याची उंची ६० सेंटीमीटर असते. काही दिवसांपूर्वीच आयसीसीने आपल्या यूट्यूब चॅनेलवर ट्रॉफी तयार करण्याच्या प्रक्रियेचा व्हिडिओ शेअर केला आहे. तो व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे. ही ट्रॉफी तयार करणाऱ्यांनी यंदाची ट्रॉफी खूप खास आहे कारण, आम्ही यजमान आहोत, असे म्हटले आहे.

 

 

अशी बनते वर्ल्ड कप ट्रॉफी?

क्रिकेट वर्ल्ड कपची ट्रॉफी अनेकांचा समावेश असलेल्या टीमकडून तयार केली जाते. ट्रॉफीचा प्रत्येक पार्ट हा हातांनी तयार केला जातो. पहिल्यांदा त्याचे पेन्सिल स्केच तयार केले जाते. त्यानंतर त्याला कॉम्प्युटर स्कॅन करून सॉलिड स्ट्रक्चर इमेज तयार केली जाते. त्यानंतर प्रत्येक पार्ट अतिशय काळजीपूर्वक तयार केला जातो. एखाद्या पार्टवर बारीक खरे पडले तरी तो पार्ट पुन्हा तयार केला जातो. ट्रॉफी पूर्ण तयार झाल्यानंतर त्यावर नक्षीकाम केले जाते. त्यासाठी २०० वर्षे जुन्या टूल्सचा वापर केला जातो. ट्रॉफीच्या बेसवर आधीच्या विजेत्या संघांची नावे कोरली जातात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, ट्रॉफीवर क्रिकेटमधील सगळ्या उपकरणांचा समावेश केलेला असतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
ICC World Cup 2019: वर्ल्ड कप ट्रॉफीविषयी हे तुम्हाला माहिती आहे का? Description: ICC World Cup 2019: वर्ल्ड कप ट्रॉफीविषयी काही रंजक गोष्टीदेखील आहेत. त्या सगळ्याच क्रिकेटप्रेमींना माहिती आहेतच असे नाही. विजेत्या टीमला मूळ ट्रॉफी न देता नकली ट्रॉफी दिली जाते हे आजही अनेकांना माहिती नाही.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola