Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहच्या जागी BCCIने या खेळाडूला दिली जागा, भारतीय संघात अचानक घेतली एंट्री

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Sep 30, 2022 | 11:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

T20 World Cup 2022:सिलेक्टर्सने जसप्रीत बुमराहच्या जागी भारतीय संघात एका स्टार खेळाडूला संधी दिली आहे. हा खेळाडू आपल्या जबरदस्त गोलंदाजीसाठी फेमस आहे. 

mohammad siraj
जसप्रीत बुमराहच्या जागी BCCIने या खेळाडूला दिली जागा 
थोडं पण कामाचं
  • बीसीसीआयने दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला संधी दिली आहे.
  • बुमराहला पाठीला दुखापत झाली आहे आणि तो सध्या बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या निगराणीखाली आहे.
  • मालिकेतील उरलेले दोन सामने गुवाहाटीमध्ये दोन ऑक्टोबर आणि इंदोरमध्ये चार ऑक्टोबरला खेळवले जातील. 

मुंबई: भारताचा घातक गोलंदाज जसप्रीत बुमराह(jasprit bumrah) दुखापतीमुळे(injury) टी-20 वर्ल्डकपमधून(t-20 world cup) बाहेर झाला आहे. यामुळे टीम इंडियाला(team india) मोठा झटका बसला आहे. वर्ल्डकपसोबतच जसप्रीत बुमराह द. आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतूनही बाहेर झाला आहे. त्याच्या जागी बीसीसीआयने(bcci) घातक गोलंदाजाला स्थान दिले आहे. हा खेळाडू खूपच शानदार फॉर्मात आहे. जाणून घेऊया या खेळाडूबद्दल...cricketer mohammad siraj replaced to jasprit bumrah

अधिक वाचा -लालू प्रसाद यादवांची ‘ही’ मिमिक्री पाहिली का?

 जसप्रीत बुमराहच्या जागी या खेळाडूला मिळाली संधी

बीसीसीआयने दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला संधी दिली आहे. बीसीसीआयने आपल्या विधानात म्हटले, सिलेक्टर्सने मोहम्मद सिराजला द. आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेसाठी दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी संघात सामील केले आहे. बुमराहला पाठीला दुखापत झाली आहे आणि तो सध्या बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या निगराणीखाली आहे. मालिकेतील उरलेले दोन सामने गुवाहाटीमध्ये दोन ऑक्टोबर आणि इंदोरमध्ये चार ऑक्टोबरला खेळवले जातील. 

जबरदस्त गोलंदाजीत माहीर

मोहम्मद सिराज धोकादायक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्याने आपल्या बळावर अनेक सामने जिंकवलेत. त्याची लाईन आणि लेंथ खूपच परफेक्ट ठरते तसेच तो किफायतशीर आहे. 28 वर्षीय मोहम्मद सिराजने भारतीय संघासाठी आपला शेवटचा टी-20 सामना फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. टी-20 क्रिकेटमध्ये त्याचे चार ओव्हर पराभव आणि विजयाचे अंतर ठरवतात.

भारतासाठी तीनही फॉरमॅटमध्ये खेळलाय

मोहम्मद सिराजने टीम इंडियासाठी तीनही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. त्याने भारतासाठी 13 कसोटीत 40 विकेट, 10 वनडेत 10 विकेट आणि 5 टीमध्ये 5 विकेट घेतल्यात. ऑस्ट्रेलिययाविरुद्ध कसोटी मालिका त्याने आपल्या जोरावर टीम इंडियाला जिंकून दिली होती. 

अधिक वाचा - शाळेत जायचे नाही म्हणून विध्यार्थ्यांने स्वतःलाच केलं किडनॅप

द. आफ्रिका मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, दीपक चाहर, उमेश यादव, श्रेयस अय्यर, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी