Cricketer Rishabh Pant Car Accident : रुड़की : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian cricket team) खेळाडू ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारला अपघात (Accident) झाला आहे. दिल्लीहून घरी परतत असताना त्याच्या कारचा हा अपघात झाला. रुडकीच्या नारसन सीमेवर हम्मदपूर झालच्या एका वळणावरील रेलिगला त्याची कार धडकल्याने हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर ऋषभला उपचारासाठी देहरादूनच्या (Dehradun) मॅक्स रुग्णालयात (Max hospital) दाखल करण्यात आले आहे. येथे पंतवर प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे. दरम्यान, खानपूर आमदार उमेश कुमार हे पंतच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहे. (Cricketer Rishabh Pant Car Accident; seriously injured )
दिल्ली-देहराडून महामार्गावर रेलिंगला धडकल्यानंतर ऋषभच्या कारला आग लागली. त्यानंतर परिसरातील उपस्थितांनी त्याला गाडीतून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. ऋषभच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतच्या (Rishabh Pant ) डोक्याला आणि पायाला दुखपत झाली आहे. अपघाताची (Accident) सुचना मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक देहात स्वप्न किशोर सिंह घटनास्थळी पोहोचले आहेत. सक्षम हॉस्पिटलचे संचालक आणि डॉ. सुशील नागर यांनी संगितले की, सध्या ऋषभ पंतची स्थिती स्थिर आहे, ऋषभ पंत रुरकीहून देहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिथे तिच्या प्लास्टिक सर्जरी केली जाईल. (Cricketer Rishabh Pant Car Accident)