दिल्ली हिंसाचार: पाहा रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांनी काय केलं ट्वीट 

Rohit Sharma, Yuvraj Singh tweets on Delhi violence: भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा यांनीही दिल्लीतील हिंसाचाराबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

cricketer rohit sharma and yuvraj singh made this tweet regarding delhi violence
दिल्ली हिंसाचार: पाहा रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांनी काय केलं ट्वीट   |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारामुळे  भारतीय क्रिकेट जगातील अनेक दिग्गज खेळाडू देखील  दु: खी झाले आहेत. यावेळी त्यांनी दिल्लीतील जनतेला शांततेचे आवाहन देखील केलं आहे. मंगळवारी टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने या हिंसाचाराबद्दल दु: ख व्यक्त केलं होतं. यावेळी त्याने हिंसाचार दुर्दैवी असल्याचं म्हणत शांतता राखण्याचं आवाहन केलं होतं. तर आज (बुधवार) टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा आणि माजी क्रिकेटर युवराज सिंह यांने देखील याबाबत ट्वीट केलं आहे.

भारताचा दिग्गज सलामीवीर रोहित शर्माने दिल्ली हिंसाचारावर ट्वीट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'दिल्लीचे हे दृश्य चांगले नाही. मला आशा आहे की सर्व काही लवकर ठीक होईल. '

त्याचवेळी भारतीय टीमचा माजी फलंदाज युवराज सिंह यांने म्हटलं आहे की, 'दिल्लीत जे काही चालले आहे ते अतिशय दु:खद आहे. सर्वांनी विनंती आहे की, त्यांनी शांतता राखावी. अशी आशा आहे की, प्रशासन परिस्थिती सामान्य करण्यासाठी काम करेल. दिवसाच्या शेवटी आपण सर्व माणसं आहोत, आपण एकमेकांचा आदर आणि प्रेम करायला शिकलं पाहिजे.'

याआधी माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि भारतीय फिरकीपटू हरभजन सिंह यांनीही दिल्ली हिंसाचारावर ट्वीट केलं होते. हरभजनने आपल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं होतं की, 'आपण आपल्याच लोकांना का मारत आहोत?, सर्वांना एकच आवाहन आहे की, एकमेकांना त्रास देऊ नका.' त्याचवेळी सेहवागनेही शांततेचं आवाहन केलं होतं.

दिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा हा आता जवळजवळ २४ वर पोचला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनीही पोलिसांसह हिंसाचार झालेल्या भागाचा दौरा केला आणि स्थानिकांशी बातचीत करत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. एनएसएने सर्वांना आश्वासन दिलं की, प्रशासन आपलं सर्व कामे त्वरित करीत आहे आणि आता परिस्थिती नियंत्रणात आहे. 

दरम्यान, आज देखील दिल्लीतील काही भागात जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे अद्यापही दिल्लीतील अनेक ठिकाणी हिंसाचार सुरु असल्याचं दिसून येत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी