CWG 2022 : वडिलांना दिलेलं गोल्डचं वचन पूर्ण झालं नसलं तरी संकेतनं वडिलांना करू नाही देणार हे काम

महाराष्ट्रातील (Maharashtra) सांगली (sangli) येथे वडिलांसोबत पान विकणाऱ्या संकेत सरगरने (Sanket Sargar) कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games) आपली ताकद दाखवून वेटलिफ्टिंगच्या (Weight lifting) ५५ ​​किलो वजनी गटात रौप्य पदक (Silver Medal) जिंकले. मात्र, त्याने वडिलांना सुवर्णपदक (gold medal) जिंकण्याचे वचन दिले होते.

Sankade saddened by missing out on a gold medal in CWG, but...
संकेतला CWG मध्ये गोल्ड मेडलं गमवल्याचं दु:ख, पण...   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कोपराच्या दुखापतीमुळे क्लीन आणि जर्कचे दोन प्रयत्न अयशस्वी
  • माझ्या यशाने माझे आई-वडीलही आनंदी आहेत
  • मलेशियाच्या बिन मोहम्मद अनिकने तिसऱ्या आणि अंतिम क्लीन अँड जर्क प्रयत्नात एकूण 142 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले.

नवी दिल्ली :  महाराष्ट्रातील (Maharashtra) सांगली (sangli) येथे वडिलांसोबत पान विकणाऱ्या संकेत सरगरने (Sanket Sargar) कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games) आपली ताकद दाखवून वेटलिफ्टिंगच्या (Weight lifting) ५५ ​​किलो वजनी गटात रौप्य पदक (Silver Medal) जिंकले. मात्र, त्याने वडिलांना सुवर्णपदक (gold medal) जिंकण्याचे वचन दिले होते. पण, त्याला फक्त रौप्य पदक जिंकता आले. मुलाच्या पदकाने वडीलही खूश आहेत. या यशानंतर संकेतला त्याचे वडील महादेव सरगर यांना दिलेले वचन आठवते.

संकेतने टाइम्स ऑफ इंडिया डॉट कॉमशी केलेल्या संभाषणात त्याच्या रौप्य पदकाबद्दल आणि त्याच्या वडिलांना दिलेल्या वचनाबद्दल खुलेपणाने सांगितले.  संकेत म्हणाला, 'माझे हे पदक कुटुंबाचे नशीब बदलणारे ठरेल, अशी आशा आहे. माझ्या वडिलांनी आता पान दुकान चालवावे असे मला वाटत नाही. २१ वर्षीय संकेत त्याच्या वजन गटात सुवर्णपदक जिंकेल असं वाटतं होतं.  पण कोपराच्या दुखापतीमुळे क्लीन आणि जर्कचे दोन प्रयत्न अयशस्वी झाल्याने त्याचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले. संकेतने एकूण 248 किलो (113+ 135 किलो) वजन उचलले आणि दुसरे स्थान पटकावले.

'वडील म्हणाले - गोल्डने नशीब बदलते'

संकेत पुढे म्हणाला, 'रौप्य पदक जिंकल्यानंतर मी माझ्या वडिलांशी आणि आईशी बोललो. माझे वडील म्हणाले, 'सोने आले असते तर बरे झाले असते, पण मला आनंद आहे. ते म्हणाले की हे पदक जिंकल्यानंतर माझ्या आयुष्यात काय बदल होतात ते पाहू. कारण माझ्या वडिलांनी मला सांगितले होते, सुवर्णपदकाने नशीब बदलते. परंतु आताच्या माझ्या यशाने माझे आई-वडीलही आनंदी आहेत आणि मला सतत प्रेरित करतात. पण, गोल्ड मेडल ते गोल्डचं असतं.

Read Also : संजय राऊत अटकेत, ईडीची कारवाई

वडिलांना समर्पित केलं पदक 

हा 21 वर्षीय वेटलिफ्टर म्हणाला, 'असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांचे आयुष्य पदक जिंकल्यानंतर बदलले आहे. सरकारने आतापर्यंत खूप मदत केली आहे. आता मला माझ्या पालकांना मदत करायची आहे. माझ्या वडिलांनी पान दुकान चालवावे, असे मला वाटत नाही. त्यांनी माझ्यासाठी खूप त्याग केला आहे. आज मी जिथे पोहोचलो आहे, त्याचे सर्व श्रेय माझ्या वडिलांना जाते. मी माझे पदक माझ्या वडिलांना समर्पित करतो. ही माझ्या प्रवासाची सुरुवात आहे. मला माहित आहे की अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

Read Also : ऑगस्टमध्ये सणांची रेलचेल, पाहा बॅंकेच्या सुट्ट्यांची यादी

संकेतने स्नॅचमध्ये वर्चस्व राखले

संकेतने स्नॅच फेरीत वर्चस्व गाजवले, परंतु कोपराला दुखापत झाल्याने आणि तीव्र वेदना होत असल्याने क्लीन अँड जर्कमध्ये तो पहिलाच प्रयत्न करू शकला. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नात 139 किलो वजन उचलण्यात तो अपयशी ठरला. मलेशियाच्या बिन मोहम्मद अनिकने तिसऱ्या आणि अंतिम क्लीन अँड जर्क प्रयत्नात एकूण 142 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले.

Read Also : कुंभमेळ्यात सत्ययुगातील समुद्र मंथनाचा देखावा

फ्रॅक्चरची चिन्हे

आपल्या दुखापतीबाबत तो म्हणाला, कोणत्या खेळाडूला दुखापत व्हायची आवड असते? कोणालाही ते नको आहे. पण, दुखापत हा खेळाचा भाग आहे. मला सुवर्ण जिंकण्याची पूर्ण आशा होती.  पण दुखापतीनंतर मी सर्व नशिबावर सोडले. मलाच नाही तर माझ्या कोच प्रशिक्षकांनाही त्याचा त्रास झाला. मी रागावलो होतो. मी झोपावे अशी त्यांची अपेक्षा होती. शेवटी, त्यांनी मला आत्मविश्वास दिला आणि आगामी स्पर्धांमध्ये मला मदत केली. सुवर्णपदक जिंकण्यासाठी प्रेरित केले.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी