3000 मीटर स्टीपलचेसमध्ये बीडच्या सुपूत्राची धाव, अविनाश साबळेने जिंकले रौप्यपदक

Commonwealth Games 2022:10,000 मीटर शर्यतीत प्रियांकाच्या रौप्य पदकानंतर, स्टीपलचेसर अविनाश साबळे याने 3000 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले आहे.

CWG 2022: Avinash Sable created history, won silver in 3000m steeplechase race
3000 मीटर स्टीपलचेसमध्ये बीडच्या सुपूत्राची धाव, अविनाश साबळेने जिंकले रौप्यपदक   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • अविनाश साबळे याने 3000 मीटर स्टीपलचेसर शर्यतीत रौप्य पदक जिंकले
  • अविनाश साबळेने राष्ट्रीय विक्रम मोडला
  • त्याने 8:11:20 अशी वेळ नोंदवला.

CWG 2022 : महाराष्ट्राचा सुपूत्र अविनाश साबळे याने 3000 मीटर स्टीपलचेसर शर्यतीत रौप्य पदक जिंकले आहे. त्याने 8:11:20 अशी वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले. राष्ट्रकुल 2022 च्या नवव्या दिवशी भारताचे हे दुसरे पदक आहे. अविनाश साबळे सुवर्णपदक विजेता अब्राहम किबिव्होटपेक्षा फक्त ०.५ सेकंद मागे होता. अब्राहमने 8.11.15 मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली.(CWG 2022: Avinash Sable created history, won silver in 3000m steeplechase race)

अधिक वाचा : CWG 2022: महिला शक्तीला सलाम, क्रिकेटमध्ये सिल्व्हर पक्कं, पण आता आणा गोल्डच

बीड जिल्ह्यातील मांडवा गावात जन्मलेल्या अविनाश साबळेने राष्ट्रीय विक्रम मोडून हे पदक जिंकले. अविनाश साबळे हे भारतीय सैन्यात सेवा करणारे ट्रॅक आणि फील्ड अॅथलीट आहेत, जे 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अविनाश साबळे यांच्या वडिलांचे नाव मुकुंद साबळे आणि भावाचे नाव योगेश साबळे आहे. त्याचे वडील शेतकरी आहेत. अविनाशने सुरुवातीचे शिक्षण गावातील सरकारी शाळेतून घेतले.

अधिक वाचा : CWG 2022 मध्ये कुस्तीपटूंनी मारलं मैदान, बजरंग पुनियानंतर साक्षी मलिकनेही जिंकले गोल्ड

2011 मध्ये 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर ते सैन्यात दाखल झाले आणि तेथून त्यांनी खेळात भाग घेण्यास सुरुवात केली. 2015 मध्ये तो आर्मी सर्व्हिस टीमसाठी पात्र ठरला. 2 वर्षांनंतर त्याने 2017 च्या क्रॉस कंट्री चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला, त्यानंतर त्याने सलग खेळांमध्ये भाग घेऊन चांगली कामगिरी केली. सध्या अविनाशची लष्करात ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर (JCO) म्हणून नियुक्ती आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी