Neeraj Chopra Injury CWG 2022 : कॉमनवेल्थ गेम्स 2022 बर्मिंगहॅम येथे होणार आहे. याआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक आणि नुकतेच जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक मिळवणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. (CWG 2022 : Big blow to India ahead of Commonwealth Games, Neeraj Chopra out of tournament)
अधिक वाचा : Ravindra Jadeja: मोठी बहीण नैनामुळे भारतीय क्रिकेट संघाचा भाग बनला रवींद्र जडेजा
भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अधिकारी राजीव मेहता यांनी सांगितले की, नीरजला दुखापत झाली आहे. यामुळे ते 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाहीत.
जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपनंतर नीरजचा एमआरआय स्कॅन करण्यात आला. यामध्ये कंबरेच्या दुखापतीची बाब समोर आली.त्यामुळे नीरजला जवळपास महिनाभर विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. याच कारणामुळे तो २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये नीरजची मॅच ५ ऑगस्टला होणार होती. पण नीरजच्या बाहेर पडल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे.
अधिक वाचा : PayTMच्या जागी हे आहे टीम इंडियाचे नवे Title Sponsor,बीसीसीआयने अचानक घेतला मोठा निर्णय
भालाफेकमध्ये नीरजच्या बाहेर पडल्यानंतर भारताला रोहित यादव आणि डीपी मनूकडून आशा असतील. आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ मध्ये नीरजने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. यापूर्वी 2017 च्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्येही त्याने सुवर्णपदक जिंकले होते. तसेच २० वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.