CWG 2022 India Vs Barbados T20 Cricket Match Updates in Marathi: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games) बुधवारी (3 ऑगस्ट) भारत (India) विरुद्ध बार्बाडोस (Barbados) महिला टी20 (Women's T20)सामना झाला. साखळी फेरीतील हा शेवटचा सामना इंग्लंडमधील (England) एजबस्टन क्रिकेट स्टेडियममध्ये (Edgbaston Cricket Stadium) खेळवला गेला. बार्बाडोसचा 100 धावांनी पराभव करून भारताची उपांत्य फेरी धडक मारली आहे. पदकाची आशा टिकवून ठेवण्यासाठी हा सामना हरमनप्रीतच्या संघासाठी अतिशय महत्त्वाचा होता.
भारताची गोलंदाज रेणुका सिंहच्या (Renuka Singh) भेदक माऱ्यापुढं बार्बाडोसचा संघानं (India Women vs Barbados Women) गुढघे टेकले. दरम्यान भारताने दिलेल्या 163 धावांचा पाठलाग करणाऱ्या बार्बाडोस संघ 20 षटकात 61 धावांच करू शकला. या विजयासह भारतानं कॉमनवेल्थ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. तर, पराभवामुळं बार्बाडोसच्या संघाचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय.
Read Also : आता उसाचा एफआरपी 3050 रुपये प्रति टन
बार्बाडोसची कर्णधार हेली मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारतीय महिलांना प्रथम फलंदाजी करण्याचे निमंत्रण दिले. निर्धारित 20 षटकांमध्ये भारताने चार बाद 162 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बार्बाडोस संघाची भारतीय गोलंदाजांनी वाताहत केली. बार्बाडोसला 20 षटकांमध्ये 8 बाद 62 धावांपर्यंतच मजल मारता आली.
भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बार्बाडोसच्या संघ 62 धावापर्यंतचं मज मारू शकला. या सामन्यात बार्बाडोसकडून किसिया नाइटनं सर्वाधिक 16 धावांची खेळी केली. त्यानंतर बार्बाडोसच्या एकही फलंदाला 15 धावांचा आकडा गाठता आला नाही. भारताच्यावतीने रेणुका सिंह ठाकुरने घातक गोलंदाजी करून चार षटकांमध्ये सर्वाधिक 4 बळी घेतले. तर, मेघना सिंह, स्नेह राणा, राधा यादव आणि कर्णधार हरमनप्रीत कौरनं प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवली.
त्यापूर्वी, या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतानं 20 षटकात चार विकेट्स गमावून 162 धावा केल्या. सलामीवीर शफाली वर्माने 26 चेंडूंत 7 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 43 धावा केल्या. तर, जेमिमाह रॉड्रिग्जने 46 चेंडूंत 6 चौकार आणि एका षटकारासह 56 धावांची नाबाद खेळी केली. हे जेमिमाहच्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीतील सातवे अर्धशतक ठरले. दीप्ती शर्मानेही नाबाद 34 धावा करून संघाला 162 धावांपर्यंत पोहचण्यास मदत केली. जेमिमाह आणि दीप्ती यांनी पाचव्या गड्यासाठी 70 धावांची शानदार भागीदारी केली. दीप्ती शर्मानंही नाबाद 34 धावांचं योगदान दिले.
Read Also : TATA Tiago NRG XT व्हेरिएंट लॉन्च, पाहा किंमत आणि फीचर्स
भारतीय संघाला स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर संघाने शानदार पुनरागमन करत पाकिस्तानवर विजय मिळवला होता. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाच होत असलेल्या महिल्यांच्या टी20 सामन्यांमध्ये भारतासह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.