बर्मिंगहम : भारतीय महिला (Indian women) ज्युदोपटू (judo Player) तुलिका मानचे बुधवारी बर्मिंगहॅम (Birmingham) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth games 2022) रौप्य पदक (silver medal) मिळवले आहे. महिलांच्या ७८ किलो वजनी गटात सुवर्णपदकाच्या सामन्यात तिचा पराभव झाला. यामुळे भारताच्या तुलिकाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. रौप्य पदक जरी मिळाले असले तरी तुलिकाने या स्पर्धेत इतिहास रचला आहे. कारण एकेरीतील तिने पटकावलेले हे पहिले पदक आहे. तर २०२२ राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोमध्ये भारताचे हे तिसरे पदक ठरले आहे.
सुवर्ण पदकासाठी सुरू असलेल्या सामन्यात तुलिका मानला स्कॉटलंडच्या (Scotland)सारा अॅडलिंग्टनकडून (Sarah Adlington) पराभव पत्करावा लागला. दरम्यान उपांत्य फेरीत दमदार विजय मिळवल्यावर तिच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या. या उपांत्यपूर्व फेरीत तिने मॉरिशसच्या ट्रेसी डरहोनचा पराभव केला होता. पण अंतिम फेरीत तिच्याकडून अधिक चांगला खेळ होऊ शकला नाही आणि त्यामुळेच तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
Read Also : रिंकू राजगुरुचा सिजलिंग लुक
भारताच्या तुलिका मानने बुधवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ७८ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत स्थान आणि पदक निश्चित केले होते. २२ वर्षांची तुलिकाने चार वेळा राष्ट्रीय जेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत तिने दमदार सुरुवात केली होती. पण तिला गुण मात्र मिळवता आले नाही. त्यामुळे ती पिछाडीवर होती. परंतु उपांत्य फेरीच्या सामन्यात तीन मिनिटांत न्यूझीलंडच्या सिडनी अँड्र्यूजला पराभूत करण्यासाठी 'इप्पॉन' कामगिरी केली.
Read Also : ५ ते १५ ऑगस्ट सर्व ऐतिहासिक स्मारकस्थळी विनामूल्य प्रवेश
यापूर्वी, सुशीला देवी लिकमाबम आणि विजय कुमार यादव यांनी ज्युदोमध्ये भारतासाठी पदके जिंकली आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी सुशीला देवी लिकमाबम हिने ज्युदोच्या ४८ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले होते. सुशीला अंतिम सामन्यात तिला दक्षिण आफ्रिकेच्या मिचेला व्हाईटबोईविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. विजय कुमार यादवने ज्युदोमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले. पुरुषांच्या 60 किलो गटात उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या जोशुआकडून त्याला पराभव पत्करावा लागला होता. यानंतर त्याला रेपेचेज सामन्यांमध्ये संधी मिळाली होती. तिथे त्याने कांस्यपदक जिंकले.
यापूर्वी भारताचा स्क्वॉशपटू सौरव घोषालने धडाकेबाज कामगिरी करत भारताला अजून एक पदक जिंकवून दिले. पुरुषांच्या सामन्यात सौरवने इंग्लंडच्या जेम्स विल्स्ट्रॉपवर दणदणीत विजय साकारला आणि भारताला कांस्यपदक पटकावून दिले होते. भारताच्या पूर्णिमा पांडेने हार मानली नाही. पूर्णिमाने वेटलिफ्टिंगच्या ८७ किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये उतरून सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. पूर्णिमाला पदक मिळवता आले नाही, पण तिने भारताचे नाव मात्र राखले होते.