बर्मिंगहॅम : 19 वर्षीय भारतीय कुस्तीपटू नवीन कुमारने पाकिस्तानी कुस्तीपटू मोहम्मद शरीफ ताहिरचा 9-0 अशा फरकाने पराभव करत सुवर्णपदक पटकावले. सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो भारताचा सहावा कुस्तीपटू आहे. भारताच्या एकूण सुवर्णपदकांची संख्या 12 झाली असून त्यापैकी 6 सुवर्णपदके भारताने कुस्तीमध्ये जिंकली आहेत. (CWG 2022: Naveen wins gold by beating Pakistani wrestler, India breaks its own sports record)
अधिक वाचा : 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये बीडच्या सुपूत्राची धाव, अविनाश साबळेने जिंकले रौप्यपदक
नवीनने ताहिरविरुद्ध पहिले दोन गुण मिळवत चांगली सुरुवात केली. या गुणांसह पहिली फेरी संपली. दुसऱ्या फेरीत नवीन आणि ताहिर यांच्यात चुरशीची लढत झाली पण अधिक बचावामुळे त्यांना आणखी एक गुण गमवावा लागला. यानंतर नवीनने सामन्यावर वर्चस्व राखत 9-0 अशी आघाडी घेतली. एकाच पकडीत त्याने पाकिस्तानी कुस्तीपटूविरुद्ध आपला विजय निश्चित केला.
अधिक वाचा : CWG 2022: महिला शक्तीला सलाम, क्रिकेटमध्ये सिल्व्हर पक्कं, पण आता आणा गोल्डच
भारतीय नौदलात कार्यरत असलेल्या नवीनने पाकिस्तानी कुस्तीपटूला एकही संधी न देता एकतर्फी झालेल्या सामन्यात नाकी नऊ आणले. त्याच्या आधी दीपक पुनिया, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, रवी दहिया आणि विनेश फोगट यांनी बर्मिंगहॅममध्ये भारतासाठी कुस्तीत सुवर्णपदक जिंकले आहे. बर्मिंगहॅममध्ये भारतीय कुस्तीपटूंचा दबदबा दिसून येत आहे. भारताने आतापर्यंत कुस्तीमध्ये 6 सुवर्ण, 1 रौप्य आणि 3 कांस्य अशी एकूण 10 पदके जिंकली आहेत.