भारताला अठरावे गोल्ड, शरथ कमल आणि श्रीजा अकुला जोडीने केली कमाल

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या अठराव्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने अठरावे गोल्ड मेडल जिंकले. टेबल टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत अचंता शरद कमल आणि श्रीजा अकुला या जोडीने मलेशियाच्या जोडीचा पराभव करून गोल्ड मेडल जिंकले.

CWG 2022 Sharath Kamal and Sreeja Akula Mixed doubles duo won gold in Table Tennis
भारताला अठरावे गोल्ड, शरथ कमल आणि श्रीजा अकुला जोडीने केली कमाल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारताला अठरावे गोल्ड, शरथ कमल आणि श्रीजा अकुला जोडीने केली कमाल
  • भारताने आतापर्यंत १८ गोल्ड, १३ सिल्व्हर आणि २१ ब्राँझ अशी ५२ मेडल जिंकली
  • भारत ५२ मेडलसह मेडल टॅलीत पाचव्या स्थानी

बर्मिंगहॅम : बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या अठराव्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने अठरावे गोल्ड मेडल जिंकले. टेबल टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत अचंता शरद कमल आणि श्रीजा अकुला या जोडीने मलेशियाच्या जोडीचा पराभव करून गोल्ड मेडल जिंकले. अचंता शरद कमल आणि श्रीजा अकुला या जोडीने मलेशियाच्या जावेन चुंग आणि करेन लिन या जोडीचा ११-४, ९-११, ११-५, ११-६ असा पराभव केला आणि गोल्ड मेडल जिंकले. 

गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुलमध्ये कांस्य जिंकणाऱ्या मलेशियाच्या जावेन चुंगने यावेळी पुन्हा एकदा राष्ट्रकुलच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. पण २००६ मध्ये मेलबर्न येथे गोल्ड मेडलचा मानकरी झालेल्या अचंता शरद कमलने अनुभव पणाला लावला. यामुळे भारताचा विजय सोपा झाला.

अचंता शरद कमलने राष्ट्रकुल आतापर्यंतच्या कारकिर्दीत आजच्या गोल्डसह १३ मेडल जिंकली. याआधी त्याने वैयक्तिक सिल्व्हर पण निश्चित केले. श्रीजा अकुला पहिल्यांदाच राष्ट्रकुलमध्ये खेळत आहे. पहिल्याच प्रयत्नात श्रीजा अकुलाने गोल्ड मेडल जिंकले. 

भारताने आतापर्यंत १८ गोल्ड, १३ सिल्व्हर आणि २१ ब्राँझ अशी ५२ मेडल जिंकली. भारत या ५२ मेडलसह मेडल टॅलीत पाचव्या स्थानी आहे. पहिल्या स्थानावर ६३ गोल्डसह (एकूण मेडल १६९) ऑस्ट्रेलिया आहे. दुसऱ्या स्थानावर ५४ गोल्डसह (एकूण मेडल १६५) इंग्लंड आणि तिसऱ्या स्थानावर २३ गोल्डसह (एकूण मेडल ८७) कॅनडा आहे. चौथ्या स्थानावर १९ गोल्डसह (एकूण मेडल ४८) न्यूझीलंड आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी