CWG2022 AUSW vs INDW T20: ऑस्ट्रेलियाला गोल्ड तर भारताला सिल्व्हर, फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा ९ धावांनी विजय

CWG2022 AUSW vs INDW T20 Australia Women won by 9 runs against India Women : बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये महिला टी २० क्रिकेट या प्रकारात फायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने बाजी मारली तर भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

CWG2022 AUSW vs INDW T20 Australia Women won by 9 runs against India Women
ऑस्ट्रेलियाला गोल्ड तर भारताला सिल्व्हर  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • CWG2022 AUSW vs INDW T20: ऑस्ट्रेलियाला गोल्ड तर भारताला सिल्व्हर
  • फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा ९ धावांनी विजय
  • भारतीय टीम १९.३ ओव्हरमध्ये १५२ धावांत ऑलआऊट

बर्मिंगहॅम : बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये महिला टी २० क्रिकेट या प्रकारात फायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने बाजी मारली तर भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यामुळे ऑस्ट्रेलिया गोल्ड आणि भारत सिल्व्हर मेडलचा मानकरी झाला. फायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा ९ धावांनी विजय झाला. या मॅचमध्ये टॉस जिंकून बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने २० ओव्हरमध्ये ८ बाद १६१ धावा केल्या. भारतीय टीम १९.३ ओव्हरमध्ये १५२ धावांत ऑलआऊट झाली. 

राष्ट्रपतींनी केले अभिनंदन

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिल्व्हर मेडल विजेत्या भारतीय महिला क्रिकेट टीमचे अभिनंदन केले. भारतीय महिला क्रिकेट टीम अखेरपर्यंत झुंज देत होती. या झुंजार वृत्तीचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कौतुक केले.

काय झाले फायनल मॅचमध्ये?

ऑस्ट्रेलियाकडून विकेटकीपर असलेल्या अॅलिसा हिलीने ७, बेथ मुनीने ६१, कॅप्टन असलेल्या मेग लॅनिंगने (धावचीत) ३६, ताहिला मॅकग्राथने २, अॅशले गार्डनरने २५, ग्रेस हॅरिसने २, रचेल हायनेसने नाबाद १८, अॅलान किंगने १, जेस जोनासेनने (धावचीत) १, मेगन शुट्टने नाबाद १ धाव एवढे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाला ७ एक्स्ट्रॉ (अवांतर) मिळाल्या. भारताकडून रेणुका सिंह आणि स्नेह राणा या दोघींनी प्रत्येकी २ तर राधा यादव आणि दीप्ती शर्मा या दोघींनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

भारताकडून शफाली वर्माने ११, स्म्रिती मंधानाने ६, जेमिमा रॉड्रिग्सने ३३, कॅप्टन असलेल्या हरप्रीत कौरने ६५, पूजा वस्रकारने १, दीप्ती शर्माने १३, स्नेह राणाने (धावचीत) ८, राधा यादवने (धावचीत) १, यास्तिका भाटियाने २, मेघना सिंहने (धावचीत) १, रेणुका सिंहने नाबाद शून्य धावा एवढे योगदान दिले. भारताला ११ एक्स्ट्रॉ (अवांतर) मिळाल्या. ऑस्ट्रेलियाकडून अॅशले गार्डनरने ३, मेगन शुट्टने २ तर डार्सी ब्राउन आणि जेस जोनासेन या दोघींनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी