CWG22: झटपट जिंकली ४ GOLD , भारत २२ GOLD मेडलसह चौथ्या स्थानी

बाविसाव्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा अखेरचा दिवस भारताने गाजवला. झटपट चार गोल्ड मेडल जिंकण्याची किमया भारताने साधली. यामुळे बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात २२ गोल्ड, १६ सिल्व्हर आणि २३ ब्राँझ अशा ६१ मेडलची नोंद झाली. 

CWG22: Quick win 4 GOLD , India 4th with 22 GOLD medals
CWG22: झटपट जिंकली ४ GOLD , भारत २२ GOLD मेडलसह चौथ्या स्थानी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • CWG22: झटपट जिंकली ४ GOLD , भारत २२ GOLD मेडलसह चौथ्या स्थानी
 • भारताच्या खात्यात २२ गोल्ड, १६ सिल्व्हर आणि २३ ब्राँझ अशा ६१ मेडलची नोंद
 • ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, कॅनडा या तीन देशांनंतर मेडल टॅलीत भारत चौथ्या स्थानी

बर्मिंगहॅम : बाविसाव्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा अखेरचा दिवस भारताने गाजवला. झटपट चार गोल्ड मेडल जिंकण्याची किमया भारताने साधली. यामुळे बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात २२ गोल्ड, १६ सिल्व्हर आणि २३ ब्राँझ अशा ६१ मेडलची नोंद झाली. भारत २२ गोल्ड मेडलसह मॅडल टॅलीत चौथ्या स्थानावर आहे. । क्रीडा / क्रिकेटकिडा

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध स्पिनर्सनी रचला इतिहास, टी-२०मध्ये असे करणारा भारत पहिला देश

ऑस्ट्रेलिया ६६ गोल्डसह (एकूण मेडल १७७) पहिल्या, इंग्लंड ५६ गोल्डसह (एकूण मेडल १७०) दुसऱ्या आणि कॅनडा २६ गोल्डसह (एकूण मेडल ९२) तिसऱ्या स्थानावर आहे.

अखेरच्या दिवशी बॅडमिंटनमध्ये भारताने ३ गोल्ड मेडल जिंकली. महिला एकेरीत पी. व्ही सिंधू तर पुरुष एकेरीत लक्ष्य सेन या दोघांनी गोल्ड मेडल जिंकले. यानंतर पुरुष दुहेरीत सात्विक साइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने गोल्ड मेडल जिंकले.

टेबल टेनिसमध्ये पुरुष एकेरीत भारताच्या अनुभवी अचंता शरथ कमल याने गोल्ड मेडल जिंकले. तसेच जी. साथियान याने टेबल टेनिसमध्ये पुरुष एकेरीत ब्राँझ मेडल जिंकले. हॉकीचा सामना सुरू आहे. यात भारत काय करतो याकडे अनेकांचे लक्ष आहे.

पी. व्ही. सिंधूने जिंकले गोल्ड मेडल

बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन या खेळात महिला एकेरीचे गोल्ड मेडल भारताच्या पी. व्ही. सिंधूने जिंकले. सिंधूने कॅनडाच्या मिचेल ली विरुद्धची मॅच २१-१५, २१-१३ अशी जिंकली. राष्ट्रकुल स्पर्धेत पी. व्ही. सिंधूच्या कामगिरीत सातत्य आहे. सिंधूने २०१४च्या ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला एकेरीत ब्राँझ, २०१८च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला एकेरीत सिल्व्हर, २०१८च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिक्स्ड टीम इव्हेंटमध्ये गोल्ड, २०२२च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिक्स्ड टीम इव्हेंटमध्ये गोल्ड आणि २०२२च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला एकेरीत गोल्ड मेडल जिंकण्याची किमया साधली.

या व्यतिरिक्त पी. व्ही. सिंधू ऑलिम्पिकमध्ये एक सिल्व्हर आणि एक ब्राँझ मेडल जिंकली. एशियन गेम्समध्ये दोन ब्राँझ, वर्ल्ड चॅम्पियन्समध्ये दोन ब्राँझ, दोन सिल्व्हर आणि एक गोल्ड मेडल जिंकली आहे. उबर कपमध्ये दोन ब्राँझ मेडल सिंधूने जिंकली आहेत. या व्यतिरिक्त सिंधूने बॅडमिंटनमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. 

लक्ष्य सेनने गोल्ड मेडलचे लक्ष्य साधले

लक्ष्य सेनने बॅडमिंटन या खेळात पुरुष एकेरीत गोल्ड मेडल जिंकले. त्याने मलेशियाच्या जे योंग विरुद्धची मॅच १९-२१, २१-९, २१-१६ अशी जिंकली. लक्ष्यने २०२० मध्ये एशियन टीम चॅम्पियनशिपमध्ये पुरुष टीमकडून ब्राँझ मेडल जिंकले होते. त्याने २०२१ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुष एकेरीचे ब्राँझ मेडल जिंकले होते. यानंतर २०२२ मध्ये थॉमस कपमध्ये पुरुष एकेरीचे गोल्ड तर २०२२ मध्ये बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिक्स्ड टीमचे सिल्व्हर मेडल जिंकले होते. यानंतर त्याने २०२२च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुष एकेरीचे गोल्ड मेडल जिंकले.

बॅडमिंटनमध्ये भारताने पुरुष दुहेरीत जिंकले गोल्ड मेडल

बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने बॅडमिंटन या खेळात पुरुष दुहेरीत गोल्ड मेडल जिंकले. भारताच्या सात्विक साइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने इंग्लंडच्या बेन लेन आणि सीन वेंडी या जोडीचा २१-१५, २१-१३ असा पराभव केला. 

टेबल टेनिसमध्ये अखेरच्या दिवशी १ गोल्ड आणि १ ब्राँझ

भारताने बर्मिंमहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिस या खेळात शेवटच्या दिवशी १ गोल्ड आणि १ ब्राँझ मेडल जिंकले. भारताच्या अनुभवी अचंता शरथ कमल याने इंग्लंडच्या लियाम पिचफोर्ड विरुद्धची मॅच ११-१३, ११-१७, ११-२, ११-६, ११-८ अशी ४-१ या पद्धतीने जिंकली आणि गोल्ड मेडल मिळवले. अचंता शरथ कमल याचे वर्ल्ड रँकिंग ३९ आहे तो ४० वर्षांचा आहे. या उलट वर्ल्ड रँकिंगमध्ये विसाव्या स्थानी असलेल्या लियाम पिचफोर्डला आजच्या मॅचमध्ये त्याचा अनुभव दाखविण्याची जास्त संधीच मिळाली नाही. अचंता शरथ कमल याने अनुभवाच्या जोरावर मॅच जिंकली. अचंता शरथ कमल याचे टेबल टेनिस या खेळातील हे बारावे मेडल आहे. त्याने बर्मिंगहॅम येथे चार मेडल जिंकली. याआधी २००६ मध्ये मेलबर्न येथे त्याने गोल्ड मेडल जिंकले होते. 

जी. साथियान याने टेबल टेनिसमध्ये पुरुष एकेरीत ब्राँझ मेडल जिंकले. त्याने इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहॉल याला ११-९, ११-३, ११-५, ८-११, ९-११, १०-१२, ११-९ असे ४-३ या पद्धतीने हरवले. वर्ल्ड रँकिंगमध्ये ३५व्या स्थानी असलेल्या साथियानने ७४व्या स्थानी असलेल्या ड्रिंकहॉलचा पराभव केला. या मॅचमध्ये दीर्घकाळ चुरस कायम होती. अखेर साथियान याने विजय मिळवला.

भारताने जिंकलेली ६१ पदके

 1. साईखोम मिराबाई चानू - वेटलिफ्टिंग ( महिला ४९ किलो) - सुवर्ण
 2. जेरेमी लालरिननुंगा - वेटलिफ्टिंग (पुरुष ६७ किलो) - सुवर्ण
 3. अचिंता शेउली - वेटलिफ्टिंग (पुरुष ७३ किलो) - सुवर्ण
 4. रुपा राणी तिर्की, लव्हली चौबे, नयनमोनी सैकिया, पिंकी सिंह - लॉन बॉल्स (चार महिला) - सुवर्ण
 5. हरमीत देसाई, साथियान ज्ञानसेकरन, सुनिल शेट्टी, अचंता शरथ कमल (पुरुष टेबल टेनिस) - सुवर्ण
 6. सुधीर (पॅरा पॉवर लिफ्टिंग, पुरुष हेवीवेट) - सुवर्ण
 7. बजरंग पुनिया (कुस्ती पुरुष ६५ किलो फ्रीस्टाईल) - सुवर्ण
 8. साक्षी मलिक (कुस्ती महिला ६२ किलो फ्रीस्टाईल) - सुवर्ण
 9. दीपक पुनिया (कुस्ती पुरुष ८६ किलो फ्रीस्टाईल) - सुवर्ण
 10. रवी कुमार दहिया (कुस्ती पुरुष ५७ किलो फ्रीस्टाईल) - सुवर्ण
 11. विनेश फोगट (कुस्ती पुरुष ७४ किलो फ्रीस्टाईल) - सुवर्ण
 12. नवीन मलिक (कुस्ती पुरुष ७४ किलो फ्रीस्टाईल) - सुवर्ण
 13. भाविना पटेल (टेबल टेनिस महिला एकेरी सी थ्री फाईव्ह) - सुवर्ण
 14. नीतू गंघासो (महिला बॉक्सिंग ४८ किलो) - सुवर्ण
 15. अमित पंघाली (पुरुष ५१ किलो बॉक्सिंग) - सुवर्ण
 16. एल्धोस पॉल (पुरुष ट्रिपल जम्प) - सुवर्ण
 17. निखत झरीन (बॉक्सिंग महिला ५० किलो) - सुवर्ण
 18. अचंता शरथ कमल आणि श्रीजा अकुला (टेबल टेनिस मिश्र दुहेरी) - सुवर्ण
 19. पी. व्ही. सिंधू (महिला एकेरी बॅडमिंटन) - सुवर्ण
 20. लक्ष्य सेन (पुरुष एकेरी बॅडमिंटन) - सुवर्ण
 21. सात्विक साइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी (पुरुष दुहेरी बॅडमिंटन) - सुवर्ण
 22. अचंता शरथ कमल (टेबल टेनिस पुरुष एकेरी) - सुवर्ण
 23. संकेत सरगर (वेटलिफ्टिंग पुरुष ५५ किलो) - रौप्य
 24. बिंद्यारानी देवी (वेटलिफ्टिंग महिला ५५ किलो) - रौप्य
 25. सुशीला देवी लिकमाबाम (ज्युडो महिला ४८ किलो) - रौप्य
 26. विकास ठाकुर (वेटलिफ्टिंग पुरुष ९६ किलो) - रौप्य
 27. भारत बॅडमिंटन टीम (मिक्स्ड टीम । श्रीकांत किदाम्बी, सात्विकसाईराज रंकीरेड्डी, बी सुमीत रेड्डी, लक्ष्य सेन, चिराग शेट्टी, गायत्री गोपीचंद, त्रीसा जॉली, आकर्षी कश्यप, अश्विनी पोनप्पा, पी. व्ही. सिंधू) - रौप्य
 28. तुलिका मान (ज्युडो महिला ७८+ किलो) - रौप्य
 29. मुरली श्रीशंकर (पुरुष लाँग जम्प) - रौप्य
 30. अंशु मलिक (कुस्ती महिला ५७ किलो फ्रीस्टाईल) - रौप्य
 31. प्रियांका गोस्वामी (महिला १० हजार मीटर वॉक) - रौप्य
 32. अविनाश साबळे (पुरुष ३ हजार मीटर स्टीपलचेस) - रौप्य
 33. सुनिल बहादुर, नवनीत सिंह, चंदन सिंह, दिनेश कुमार (लॉन बॉल्स चार पुरुष) - रौप्य
 34. अब्दुल्ला अबुबकर (पुरुष ट्रिपल जम्प) - रौप्य
 35. साथियान ज्ञानसेकरन आणि अचंता शरथ कमल (टेबल टेनिस पुरुष दुहेरी) - रौप्य
 36. भारत महिला क्रिकेट टीम (टी २०) - रौप्य
 37. सागर अहलावत (बॉक्सिंग पुरुष ९२+ किलो) - रौप्य
 38. भारतीय पुरुष हॉकी टीम - रौप्य
 39. गुरुराजा पुजारी (वेटलिफ्टिंग पुरुष ६१ किलो) - कांस्य
 40. विजय कुमार यादव (ज्युडो पुरुष ६० किलो) - कांस्य
 41. हरजिंदर कौर (वेटलिफ्टिंग महिला ७१ किलो) - कांस्य
 42. लव्हप्रीत सिंह (वेटलिफ्टिंग महिला १०९ किलो) - कांस्य
 43. सौरव घोषाल (स्क्वॅश पुरुष एकेरी) - कांस्य
 44. गुरदीप सिंह (वेटलिफ्टिंग पुरुष १०९+ किलो) - कांस्य
 45. तेजस्विन शंकर (पुरुष हाय जम्प) - कांस्य
 46. दिव्या काकराणी (कुस्ती महिला ६८ किलो फ्रीस्टाईल) - कांस्य
 47. मोहित ग्रेवाल कुस्ती पुरुष १२५ किलो फ्रीस्टाईल) - कांस्य
 48. जास्मिन लॅम्बोरिया (बॉक्सिंग महिला लाइटवेट) - कांस्य
 49. पूजा गेहलोत (कुस्ती महिला ५० किलो फ्रीस्टाईल) - कांस्य
 50. पूजा सिहाग (कुस्ती महिला ७६ किलो फ्रीस्टाईल) - कांस्य
 51. मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग पुरुष फेदरवेट) - कांस्य
 52. दीपक नेहरा (कुस्ती पुरुष ९७ किलो फ्रीस्टाईल) - कांस्य
 53. सोनलबेन पटेल (टेबल टेनिस महिला एकेरी सी थ्री फाईव्ह) - कांस्य
 54. रोहित टोकस (बॉक्सिंग पुरुष वॉल्टरवेट) - कांस्य
 55. भारतीय महिला हॉकी टीम - कांस्य
 56. संदीप कुमार (पुरुष १० हजार मीटर वॉक) - कांस्य
 57. अन्नु राणी (महिला जॅव्हलिन थ्रो) - कांस्य
 58. सौरव घोषाल आणि दिपिका पल्लीकल (स्क्वॅश मिश्र दुहेरी) - कांस्य
 59. श्रीकांत किदाम्बी (बॅडमिंटन पुरुष एकेरी) - कांस्य
 60. गायत्री गोपीचंद आणि त्रीसा जॉली (बॅडमिंटन महिला दुहेरी) - कांस्य
 61. जी. साथियान (टेबल टेनिस पुरुष एकेरी) - कांस्य

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी