ऑस्ट्रेलियाचे २ खेळाडू तिसऱ्या वन डे, T20तून बाद

ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धची ३ वन डे मॅचची मालिका २-० अशी जिंकली. पण तिसरी मॅच होण्याआधीच ऑस्ट्रेलियाचे दोन खेळाडू टीममधून बाद झाले.

D Short replaces injured David Warner, Pat Cummins rested
ऑस्ट्रेलियाचे २ खेळाडू तिसऱ्या वन डे, T20तून बाद 

थोडं पण कामाचं

 • ऑस्ट्रेलियाचे २ खेळाडू तिसऱ्या वन डे, T20तून बाद
 • डेव्हिड वॉर्नरला मांडीला दुखापत
 • गोलंदाज पॅट कमिन्सला विश्रांती देणार

सिडनी: ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धची ३ वन डे मॅचची मालिका २-० अशी जिंकली. पण तिसरी मॅच होण्याआधीच ऑस्ट्रेलियाचे दोन खेळाडू टीममधून बाद झाले. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि वेगवान फलंदाज पॅट कमिन्स तिसरी वन डे आणि ट्वेंटी ट्वेंटी मॅचची मालिका खेळणार नाही. (D Short replaces injured David Warner, Pat Cummins rested)

डेव्हिड वॉर्नरला रविवारी सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे झालेल्या दुसऱ्या वन डे मॅच दरम्यान फिल्डिंग करताना मांडीला दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याला तिसरी वन डे मॅच आणि ट्वेंटी ट्वेंटी मॅचच्या मालिकेसाठी विश्रांती देण्याचा निर्णय झाला. वॉर्नर कसोटी मालिकेपर्यंत फिट होईल, अशी आशा ऑस्ट्रेलियाच्या टीम मॅनेजमेंटने व्यक्त केली. वॉर्नरच्या ऐवजी डी. शॉर्ट ऑस्ट्रेलियाकडून तिसरी वन डे आणि ट्वेंटी ट्वेंटी मालिका खेळण्याची शक्यता आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडलेडच्या ओव्हल मैदानावर १७ डिसेंबर पासून पहिली टेस्ट मॅच खेळली जाईल. ही डे नाईट टेस्ट मॅच पिंक बॉलने खेळली जाईल. यानंतर होणाऱ्या पुढील तीन टेस्ट मॅच सामान्य पद्धतीने दिवसा खेळवल्या जातील. टेस्ट रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया ११६ रेटिंगसह पहिल्या स्थानावर आहे. न्यूझीलंड ११५ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारत ११४ रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे. टेस्टमधील रँकिंग सुधारणे आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील टीमची स्थिती आणखी चांगली करणे याकरिता ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही टीमसाठी ऑस्ट्रेलियात होत असलेली चार टेस्ट मॅचची मालिका जिंकणे आवश्यक आहे.

टेस्ट मालिकेचे महत्त्व लक्षात घेऊन टीम मॅनेजमेंटने दुखापत झाली नसूनही गोलंदाज पॅट कमिन्स याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या कसोटीपर्यंत ताजातवाना व्हावा यासाठी त्याला विश्रांती देण्यात आली आहे. 

मार्कस स्टोइनिसला पहिल्या वन डे मॅचमध्ये बॉलिंग करताना दुखापतीचा त्रास झाला. ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी सुरू असताना डावाची सातवी ओव्हर टाकण्यासाठी मार्कस स्टोइनिसने चेंडू हाती घेतला. त्याने ओव्हरचा दुसरा चेंडू टाकला आणि त्यानंतर त्याला दुखापतीचा त्रास होऊ लागला. हा त्रास असह्य झाल्यामुळे त्याने लगेच मैदान सोडले आणि ग्लेन मॅक्सवेलने त्याच्या ओव्हरचे उरलेले चेंडू टाकले. क्रिकेट डॉट कॉम एयू या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार ३१ वर्षांच्या मार्कस स्टोइनिसला पोटदुखीचा त्रास अचानक त्रास देऊ लागला. पोटाच्या डाव्या बाजूस त्याला प्रचंड त्रास झाला. अद्याप तो दुखापतीतून सावरलेला नाही. याच कारणामुळे तो दुसऱ्या वन डे मॅचमध्ये खेळला नाही. मात्र गोलंदाज म्हणून नाही तर फक्त फलंदाज म्हणून त्याला तिसऱ्या वन डे मॅचसाठी खेळवता येईल का याचा विचार ऑस्ट्रेलियाची टीम मॅनेजमेंट करत आहे.

मिशेल मार्श याला गुडघ्याला दुखापत झाली आहे. आयपीएल सुरू असताना झालेल्या या दुखापतीतून अद्याप मार्श सावरलेला नाही. तो ऑस्ट्रेलिया ए टीमकडून भारताविरुद्धच्या प्रॅक्टिस मॅच खेळणार नाही.

वन डे आणि ट्वेंटी ट्वेंटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाची टीम - अॅरॉन फिंच (कॅप्टन), सीन अॅबॉट, अॅश्टन अगर, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवुड, मोसेस हेन्रीक्स, मार्नस लब्यूशेन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, डी. शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वेड, अँड्र्यू टाय, अ‍ॅडम झंपा

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०२०-२१)

वन डे

 1. पहिली वन डे - २७ नोव्हेंबर, सिडनी, सिडनी क्रिकेट ग्राउंड, भारतीय वेळेनुसार सकाळी ९.१० -  ऑस्ट्रेलियाचा ६६ धावांनी विजय
 2. दुसरी वन डे - २९ नोव्हेंबर, सिडनी, सिडनी क्रिकेट ग्राउंड, भारतीय वेळेनुसार सकाळी ९.१० - ऑस्ट्रेलियाचा ५१ धावांनी विजय
 3. तिसरी वन डे - १ डिसेंबर, कॅनबेरा, मनुका ओव्हल ग्राउंड, भारतीय वेळेनुसार सकाळी ९.१०

टी ट्वेंटी

 1. पहिली टी ट्वेंटी - ४ डिसेंबर, कॅनबेरा, मनुका ओव्हल ग्राउंड, भारतीय वेळेनुसार दुपारी १.४०
 2. दुसरी टी ट्वेंटी - ६ डिसेंबर, सिडनी, सिडनी क्रिकेट ग्राउंड, भारतीय वेळेनुसार दुपारी १.४०
 3. तिसरी टी ट्वेंटी - ८ डिसेंबर, सिडनी, सिडनी क्रिकेट ग्राउंड, भारतीय वेळेनुसार दुपारी १.४०

टेस्ट

 1. पहिली टेस्ट - १७ ते २१ डिसेंबर (डे नाईट, पिंक बॉल मॅच), अॅडलेड ओव्हल, भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३०
 2. दुसरी टेस्ट - २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, भारतीय वेळेनुसार पहाटे ५
 3. तिसरी टेस्ट - ७ ते ११ जानेवारी, सिडनी, सिडनी क्रिकेट ग्राउंड, भारतीय वेळेनुसार पहाटे ५
 4. चौथी टेस्ट - १५ ते १९ जानेवारी, ब्रिस्बेन, द गाबा ब्रिस्बेन, भारतीय वेळेनुसार पहाटे ५.३०

प्रॅक्टिस मॅच

 1. पहिली प्रॅक्टिस मॅच - ६ ते ८ डिसेंबर, इंडिया ए वि. ऑस्ट्रेलिया ए, सिडनी, ड्रमॉएन ओव्हल ग्राउंड, भारतीय वेळेनुसार पहाटे ५
 2. दुसरी प्रॅक्टिस मॅच - ११ ते १३ डिसेंबर, इंडिया ए वि. ऑस्ट्रेलिया ए, सिडनी, सिडनी क्रिकेट ग्राउंड, भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टी ट्वेंटी भारतीय टीम - विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अगरवाल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनिष पांड्ये, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रविंद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रित बुमराह, मोहम्मद शामी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी. नटराजन

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वन डे भारतीय टीम - विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनिष पांड्ये, हार्दिक पांड्या, मयांक अगरवाल, रविंद्र जाडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रित बुमराह, मोहम्मद शामी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन (विकेटकीपर)

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टेस्ट भारतीय टीम - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमान विहारी, शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), जसप्रित बुमराह, मोहम्मद शामी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी