Jasprit Bumrah:बुमराहशी पंगा घेऊ नकोस, त्याने असे अँडरसनसोबत केले आहे...डेल स्टेनला सल्ला

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 06, 2022 | 18:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

Dale steyn advice to jansen: भारताच्या फलंदाजीदरम्यान ५४व्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने मार्को जेनसेनला स्लेज केले. तो भडकला आणि दोघांमध्ये भांडणासारखी स्थिती निर्माण झाली. 

jasprit bumrah
बुमराहशी पंगा घेऊ नकोस, त्याने असे...स्टेनचा जेनसेनला सल्ला 
थोडं पण कामाचं
  • डेल स्टेनचा मार्को जेनसेनला सल्ला
  • जसप्रीत बुमराहशी पंगा घेऊ नको
  • बुमराहने याआधी जेम्स अँडरसनशीही असेच केले आहे

मुंबई: द. आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज मार्को जेनसे(Marck Jansen)ला टीमचा(IND vs SA, 2nd Test) वरिष्ठ गोलंदाज डेल स्‍टेन (Dale Styen) ने विशेष सल्ला दिला आहे. स्टेनच्या मते जेनसेन सध्या बच्चा आहे आणि त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा खूप अनुभव नाही. त्याने सल्ला दिला की बुमराहसोबत मैदानावर जास्त वाद घालू नको आणि केवळ गोलंदाजीवर लक्ष द्यावे. ही घटना भारताच्या फलंदाजीदरम्यान समोर आली होती. बुमराह फलंदाजी करत होता तेव्हा जेनसेन गोलंदाजी करत होता. टीम इंडियाने आपल्या दुसऱ्या डावा दरम्यान २६६ धावा केल्या आणि यजमान संघाला विजयासाठी २४० धावांचे लक्ष्य दिले. dale steyn advised to marck janesen about Jaspreet bumrah

डेल स्टेनने जसप्रीत बुमराह आणि जेनसेन यांच्याती घटना पाहिला आणि ट्विटरवर लिहिले, मार्को जेनसेन मी शपथ खातो की ही जुनी गोष्ट नाही आहे जेव्हा जसप्रीत बुमराह मिस्टर जेम्स अँडरसनला याचपद्धतीने स्लेज करत होता. या पद्धतीची स्लेजिंग झेलणे शिकून घे बाळा. 

राहुलच्या विकेटवरून वाद

टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात सातव्या ओव्हरमध्ये मार्को जानेसन गोलंदाजी करत होता. ओव्हरच्या पाचव्या बॉलवर राहुलच्या बॅटवर लागून स्लिपमध्ये उभ्या असलेल्या अॅडेन मार्करमच्या हाती गेला. द. आफ्रिकेच्या खेळाडूंनी विकेट घेतल्याचा जल्लोष सुरू कला. मात्र राहुल क्रीझवर उभा होता. यानंतर अपायर्सनी थर्ड अंपायरकडे निर्णय सांगितला. रिप्लेमध्ये पाहिले की बॉल ग्राऊंडला न लागला सरळ मार्करमच्या हाती गेला. यामुळे मैदानावरील अंपायरने सॉफ्ट सिग्नलच्या आधारावर राहुलला बाद घोषित केले. दरम्यान, राहुल यानंतरही थांबला आणि त्याचे द. आफ्रिकेशी वाजले.

ऋषभ पंतच्या कॅचने झाला हंगामा

मैदानावरील अंपायरने लंचआधी शार्दूल ठाकूरच्या बॉलवर वान डेर दुसेला विकेटमागे कॅच आऊट दिले होते. मात्र विकेटकीपर ऋषभ पंतने घेतलेल्या या विकेटच्या वैधतेवरून वाद सुरू झाला होता. दरम्यान कोणतेही स्पष्ट साक्ष मिळाली नाही की बॉल पंतच्या ग्लव्ह्जमध्ये जाण्याआधी जमिनीला टेकला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी