ENG vs NZ: डॅरिल मिशेलचा मोठा कारनामा! इंग्लंडविरूद्ध ७३ वर्षांनंतर असे करणारा ठरला पहिला किवी फलंदाज 

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 24, 2022 | 15:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

ENG vs NZ Test Series | सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना हेडिंग्ले लीड्स येथे खेळवला जात आहे.

Daryl Mitchell becomes first New Zealand player to score 400 against England after 73 years
७३ वर्षांचा नकोसा विक्रम मोडित, डॅरिल मिशेलचा मोठा कारनामा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे.
  • डॅरिल मिशेलचा मोठा कारनामा.
  • इंग्लंडविरूद्ध ७३ वर्षांनंतर असे करणारा ठरला पहिला किवी फलंदाज.

ENG vs NZ Test Series | नवी दिल्ली : सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना हेडिंग्ले लीड्स येथे खेळवला जात आहे. न्यूझीलंडचे स्टार फलंदाज डॅरिल मिशेल आणि टॉम ब्लंडेल यांनी सहाव्या बळीसाठी शतकीय भागीदारी करत संघाला सन्मानजनक स्थितीत आणले आहे. दरम्यान न्यूझीलंडचा ऑलराउंडर खेळाडू डॅरिल मिशेलने आपल्या नावावर एक मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ४०० किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो ७३ वर्षांनंतर पहिला किवी फलंदाज ठरला आहे. (Daryl Mitchell becomes first New Zealand player to score 400 against England after 73 years). 

डॅरिल मिशेलच्या आधी न्यूझीलंडचा माजी फलंदाज बर्ट सटक्लिफने १९४९ मध्ये इंग्लंडविरुद्ध सात डावात ४५१ धावा केल्या होत्या. त्या मालिकेत त्याने एक शतक आणि चार अर्धशतके झळकावली  होती. 

अधिक वाचा : पाकिस्तानात आता कागदी संकट, पुस्तकांचा भासतोय मोठा तुटवडा

डॅरिल मिशेलचा मोठा कारनामा

दरम्यान, तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मिशेल नाबाद ७८ धावांवर खेळत आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा फलंदाज शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने पाच डावात १५०.३३ च्या सरासरीने ४२३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने दोन शतके आणि दोन अर्धशतकेही झळकावली आहेत.

मिशेल आणि ब्लंडेलची ही तिसरी शतकीय भागीदारी

तिसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ५ गडी गमावून २२५ धावा केल्या आहेत. स्टंपच्या वेळी मिशेल १५९ चेंडूत ७८ आणि ब्लंडेल १९८ चेंडूत ४५ धावांवर खेळपट्टीवर टिकून आहे. दुसऱ्या कसोटीतही दोन्ही खेळाडूंनी २३६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली होती. या मालिकेत मिशेल आणि ब्लंडेलची ही तिसरी शतकीय भागीदारी आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी