Daryl Mitchell's Six Viral Video । नवी दिल्ली : सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या सामन्यातून पुनरागमन करण्यासाठी किवीचा संघ सज्ज झाला आहे. दोन्ही संघांमधील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा सामना नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळला जात आहे. शुक्रवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडने ४ गडी गमावून ३८४ धावा केल्या होत्या. डॅरिल मिशेल (८१*) आणि टॉम ब्लंडेल (६७*) दिवसाचा खेळ संपला तेव्हा नाबाद राहिले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मिशेलने आपल्या डावात ९ चौकार आणि २ षटकार मारले आहेत. मात्र सगळीकडे चर्चा रंगली ती मिशेलच्या एका षटकाराची. जो थेट महिला चाहत्याच्या बिअरच्या ग्लासात पडला. ही दृश्ये पाहून स्टेडियमधील उपस्थित प्रेक्षक थक्कच झाले. (Daryl Mitchell hits six in beer glass Watch video).
अधिक वाचा : देवेंद्र फडणवीस यांना माणसं जमा करण्यात यश - शरद पवार
दरम्यान, सुसान असे त्या महिला चाहत्याचे नाव आहे. जॅक लीचच्या ओव्हरमध्ये मिशेलने मोठा षटकार लगावला, ज्यामुळे स्टेडियममध्ये बसलेल्या महिला चाहत्याला नुकसानीचा सामना करावा लागला. मात्र या घटनेनंतर न्यूझीलंडने आपल्या एका चालीने महिला चाहत्यांची मने जिंकली. किवी संघ सुसानला बिअरचा ग्लास भेट देऊन भरपाई करतो. याशिवाय जेव्हा दिवसाचा खेळ संपला तेव्हा मिशेलने सुसानला भेटून फोटोसाठी पोजही दिल्या. एकीकडे मिशेलच्या षटकारांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तर दुसरीकडे एका चाहत्याची अशा प्रकारे काळजी घेतल्याबद्दल न्यूझीलंडच्या संघाची खूप प्रशंसा होत आहे.
डॅरिल मिशेल आणि टॉम ब्लंडेलच्या जोडीने पुन्हा एकदा न्यूझीलंडसाठी शानदार फलंदाजी केली. दोघांनी पाचव्या बळीसाठी २७२ चेंडूत नाबाद १४९* धावांची भागीदारी करत संघाला ३०० धावांच्या पार नेले. पहिल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या मिचेलने ९१ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. तर ब्लंडेलने ९३ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. लक्षणीय बाब म्हणजे पहिल्या दिवशी नाणेफेक हरल्यानंतर कर्णधार टॉम लॅथम आणि विल यंग यांच्या जोडीने न्यूझीलंडला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या बळीसाठी ८४ धावांची भागीदारी केली.