T20 world Cup: क्रिकेटच्या एका फॉरमॅटमधून निवृत्ती घेतोय हा फलंदाज

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 14, 2022 | 14:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

T20 world Cup 2022:टी20 वर्ल्ड कप 2022  संपल्यानंतर एका जबरदस्त फलंदाजाने मोठा खुलासा आहे. हा खेळाडू क्रिकेटच्या एका फॉरमॅटमधून लवकरच निवृत्ती घेत आहे. 

david warner
क्रिकेटच्या एका फॉरमॅटमधून निवृत्ती घेतोय हा फलंदाज 
थोडं पण कामाचं
  • ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामी फलंदाज डेविड वॉर्नरने पुढील वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिले आहे.
  • दरम्यान तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळू शकतो.
  • वॉर्नरने हे विधान ऑस्ट्रेलियाच्या  टी20 वर्ल्ड कपमधून पहिल्याच फेरीत बाहेर गेल्यानंतर केले होते.

मुंबई: टी20 वर्ल्ड कप 2022 चा(t-20 world cup 2022) हंगाम क्रिकेट चाहत्यांसाठी(cricket fans) अविस्मरणीय ठरला. या स्पर्धेत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळेले. तर फायनल सामन्यात इंग्लंडने(england) पाकिस्तानला(pakistan) हरवत खिताब आपल्या नावे केला. टी20 वर्ल्ड कप 2022  संपताच क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. या स्पर्धेत फ्लॉप ठरलेला एक खेळाडू लवकरच निवृत्तीची घोषणा(reirement announcement) करू शकतो. david warner gives hints of retirement from test cricket

अधिक वाचा - सोमवारी करा हे उपाय, शंकराच्या कृपेने घरात लक्ष्मी नांदेल

हा खेळाडू करू शकतो निवृत्तीची घोषणा

ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामी फलंदाज डेविड वॉर्नरने पुढील वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिले आहे. दरम्यान तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळू शकतो. वॉर्नरने हे विधान ऑस्ट्रेलियाच्या  टी20 वर्ल्ड कपमधून पहिल्याच फेरीत बाहेर गेल्यानंतर केले होते. वॉर्नरने एका कार्यक्रमात म्हटले की, कसोटी क्रिकेट पहिला फॉरमॅट आहे जो मी सोडू शकतो. कदाचित कसोटी क्रिकेटमधील हे माझे शेवटचे 12 महिने असू शकतात. ऑस्ट्रेलियाचा 2023 चा कसोटी कार्यक्रम खूप व्यस्त आहे. यात भारतात फेब्रुवारी-मार्चमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचाही समावेश आहे. 

कसोटी क्रिकेटमध्ये चांगला रेकॉर्ड

या 36 वर्षीय फलंदाज डेविड वॉर्नरने 2011मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 96 कसोटी सामन्यात 46.52च्या सरासरीने 7817 धावा केल्या आहेत. यात 24 शतके आणि 34 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 138 वनडेत 44.60च्या सरासरीने 5799 धावा आणि 99 टी20 सामन्यात 32.88 च्या सरासरीने 2894 धावा केल्या आहेत. 

पुढील वर्षी भारतात वर्ल्डकप

भारतात पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये 50 ओव्हरर्सचा वर्ल्डकप रंगणार आहे. तर टी20 वर्ल्ड कप 2024 वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होईल. वॉर्नरने स्पष्ट केले की त्याला या दोन्ही स्पर्धांमध्ये खेळायचे आहे. तो म्हणाला, मला मर्यादित क्रिकेट खेळणे आवडते हे खूप शानदार आहे. मला  टी20 क्रिकेटमध्ये खेळायला आवडते आणि मला 2024चा वर्ल्डकप खेळायचा आहे. ॉ

अधिक वाचा - आमदारकीचा राजीनामा देतो, जितेंद्र आव्हाडांचे ट्वीट

ऑस्ट्रेलिया सुपर 12 स्टेजमधून बाहेर

ऑस्ट्रेलिया संघाला यंदाच्या वर्ल्डकपमधून सुपर 12 स्टेजमधूनच बाहेर पडावे लागले. त्यांच्याच भूमीवर हा वर्ल्डकप खेळवण्यात आला मात्र त्यांना सेमीफायनलही गाठता आली नाही. इंग्लंडने लंकेचा पराभव केल्याने इंग्लंड सेमीफायनलमध्ये पोहोचली त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचे स्वप्न भंगले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी