T20 WC: हे त्याच्यासाठी चांगले आहे...तर माझ्यासाठीही, वॉर्नरने केली रोनाल्डोची नक्कल

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 29, 2021 | 17:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर आपल्या फॉर्ममध्ये पुनरागमन करण्यात यशस्वी ठरला आहे. वॉर्नरने गुरूवारी श्रीलंकेविरुद्ध ४२ बॉलमध्ये ६५ धावांची खेळी केली. त्याामुळे ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेला हरवता आले. 

ronaldo
T20 WC: वॉर्नरने केली रोनाल्डोची नक्कल 
थोडं पण कामाचं
  • ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला सात विकेटनी हरवले. 
  • डेविड वॉर्नरने केली ६५ धावांची खेळी
  • वॉर्नरने स्टार फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डोची नक्कल करण्याचा प्रयत्न केला.

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर(david warner) अखेर आपल्या फॉर्ममध्ये परतण्यात यशस्वी ठरला आहे. वॉर्नरने गुरूवारी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ४२ बॉलमध्ये ६५ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला ७ विकेटनी हरवले. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वॉर्नरने स्टार फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डोची(Cristiano Ronaldo) नक्कल करण्याचा प्रयत्न केला. वॉर्नरने समोर ठेवलेल्या दोन सॉफ्ट ड्रिंकच्या बाटल्या उचलताना म्हटले, मी यांना हटवू शकतो का मात्र लगेचच एका अधिकाऱ्याने स्पॉन्सरशिपमुळे बाटल्या परत ठेवण्यास सांगितले.  वॉर्नरने अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकत म्हटले, जर हे रोनाल्डोसाठी चांगले आहे तर माझ्यासाठीही आहे. david warner mimics of Cristiano Ronaldo in press conference

काही दिवसांपूर्वी युरो कप २०२०मधील एका प्रेस कॉन्फरन्समध्ये रोनाल्डोनेही या कंपनीच्या सॉफ्ट ड्रिंकच्या दोन बाटल्या टेबलावरून हटवल्या होत्या. त्यानंतर पाण्याच्या बाटल्या हातात घेत म्हटले होते, पाणी प्या. रोनाल्डोच्या या विधानानंतर त्या सॉफ्ट ड्रिंक कंपनीला मोठे नुकसान झाले होते. यामुले कोका कोलाचे शेअर साधारण १.६ टक्क्यांपर्यंत घसरले होते आणि कंपनीला ५.२ बिलियन डॉलरचे नुकसान झाले होते. 

वॉर्नरने पत्रकार परिषदेत सांगितले, प्रत्येकजण माझ्या फॉर्मबाबत चिंता करत होता. त्यांना मी पुन्हा सांगितले होते की ही काही अशी गोष्ट नाही की ज्याबाबत मी चिंतेत राहू. हे केवळ मैदानावर उतरणे आणि चांगली सुरूवात करण्याबाबत होते. आम्ही फक्त इतके करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे गोलंदाजावर दबाव बनू शकतो. 

कोका कोलाच्या बाटल्या बघून भडकला

युरो कपचा गतविजेता पोर्तुगाल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत कोल्ड ड्रिंकच्या बाटल्या पाहून चिडला. त्याने आपल्या समो कोको कोलाच्या बाटल्या पाहून नाराजी व्यक्त केली. रोनाल्डोने रागात म्हटले की कोल्ड ड्रिंक नव्हे तर आपल्याला पाणी पिले पाहिजे. खरंतर ३६ वर्षीय रोनाल्डो फिट राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कोल्ड ड्रिंक आणि इतर ड्रिंकपासून दूर राहतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी