AUS vs BAN: वर्ल्ड कपमध्ये आले वॉर्नर नावाचे वादळ, बनवला नवा वर्ल्ड रेकॉर्ड 

David Warner, World Cup: ऑस्ट्रेलिया विरूद्ध बांग्लादेश यांच्या वर्ल्ड कप २०१९ चा २६ वा सामना होत असून या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने ऐतिहासिक खेळी केली.

David Warner
डेव्हिड वॉर्नर  |  फोटो सौजन्य: Twitter

नॉटिंघम :   ट्रेंटब्रिज मैदानावर गुरूवारी वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा सामना बांग्लादेश सोबत खेळविण्यात आला. या वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ लयीत असून यात सामन्यात एखाद्या मोठ्या धमाक्याची शक्यता होती. झाले ही तसे ऑस्ट्रेलियाचा फॉर्मात असलेला सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने ऐतिहासिक खेळी केली. या स्फोटक फलंदाजाने आपल्या खेळीने बांग्लादेशच्या फलंदाजांना पळता भूई थोडी केली. या सोबत विक्रमांचा पाऊस पाडला. 

डेव्हिड वॉर्नरने नॉटिंघममध्ये खेळताना पहिल्या ५५ चेंडूत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर जोरदार फलंदाजी करताना ११० चेंडूत शतक साजरे केले. त्यानंतर तो थांबला नाही. पुढच्या २९ चेंडूत त्याने ५० धावा कर १३९ चेंडूत १५० चा आकडा पार केला. तो वेगाने पुढे जात होता असे वाटले की तो यंदाच्या वर्ल्ड कपमधील पहिले द्विशतक झळकावले. पण ४५ व्या षटकात सौम्य सरकारच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. 

वॉर्नर आऊड होण्यापूर्वी १४७ चेंडूत १६६ धावांची खेळी केली. यात ५ षटकार आणि १४ चौकारांचा सामावेश आहे. हे वॉर्नरचे ११२ वन डेमधील १६ शतक आहे. या वर्ल्ड कपमधील दुसरे शतक त्याने साजरे केले. यापूर्वी टॉन्टनमध्ये त्याने पाकिस्तान विरूद्ध १०७ धावांची खेळी केली होती. तसेच त्यांना दोन अर्धशतकंही झळकावले आहेत. अफगाणिस्तान विरूद्ध त्याने ८९ धावा तर भारताविरूद्ध ५६ धावांची खेळी केली आहे. 

बनवले वर्ल्ड रेकॉर्ड 

आपल्या या धमाकेदार खेळीसोबत डेव्हिड वॉर्नर याने एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड बनविला. तो वर्ल्ड कपमध्ये दोन वेळा १५० प्लस धावा करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. यापूर्वी वॉर्नरने २०१५ च्या वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान विरूद्ध १७८ धावांची केळी केली होती. त्याच्या करिअरची सर्वोत्कृष्ट खेळी १७९ आहे. 

वॉर्नरने यंदाच्या विश्वचषकात १६६ धावांची खेळी करणारा तो पहिला फलंदाज बनला आहे.  ही आतापर्यंतची या वर्ल्ड कपमधील बेस्ट खेळी ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या  एरॉन फिन्च आणि जेसन रॉयच्या नावावर होता. फिन्चने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात १५३ धावा केल्या होत्या.  तर इंग्लंडच्या जेसन रॉयनंही बांग्लादेशविरूद्ध १५३ धावांची खेळी साकारली होती.

विराटशी केली बरोबरी

डेव्हिड वॉर्नरने ११६ सामन्यात १६ वे शतक साजरे केले आहे. त्याने विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. त्याने शिखर धवन आणि जो रूटला मागे टाकले आहे. अमला या लिस्टमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्याने ९४ डावात १६ शतकं झळकावली आहेत. 

गिलख्रिस्टची बरोबरी 

शतकाच्या बाबतीत तो ऑस्ट्रेलियाचा क्रमांक ३ चा फलंदाज ठरला आहे. त्याने माजी विकेट किपर गिलख्रिस्टची बरोबरी केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
AUS vs BAN: वर्ल्ड कपमध्ये आले वॉर्नर नावाचे वादळ, बनवला नवा वर्ल्ड रेकॉर्ड  Description: David Warner, World Cup: ऑस्ट्रेलिया विरूद्ध बांग्लादेश यांच्या वर्ल्ड कप २०१९ चा २६ वा सामना होत असून या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने ऐतिहासिक खेळी केली.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola