चेन्नई: जसा विचार केला होता तसेच घडले. ३३ वर्षीय इंग्लिश फलंदाज डेविड मलानला(dawid malan) गुरूवारी आयपीएल २०२१च्या लिलावात(ipl 2021 auction) किंग्स इलेव्हन पंजाबने(kings xii punjab) त्याची बेस प्राईज १.५ कोटी रूपयांना खरेदी केले आहे. डावखुरा फलंदाज डेविड मला यावर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करत आहे.
डेविड मलानला आपल्या संघात घेण्यासाठी फ्रेंचायझीमध्ये जोरदार स्पर्धा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र तसे काही घडले नाही. मलानच्या नावाची जशी घोषणा झाली तसे किंग्स इलेव्हन पंजाबने आपला हात वर केला.आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या कोणत्याही फ्रेंचायझीने मलानला खरेदी करण्यासाठी कोणताही रस दाखवला नाही. यामुळे मलान आपल्या बेस प्राईजवर किंग्स इलेव्हन पंजाब संघात गेला.
डेविड मला आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. टी-२० प्रकारात मलानने ५०हून अधिकच्या सरासरीने आणि १५० स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. मलानने आतापर्यंत १९ टी-२० सामन्यांमध्ये ५३.४४च्या सरासरीने आणि १५० च्या स्ट्राईक रेटने ८५५ धावा केल्या. या इंग्लिश फलंदाजाने १० वेळा अर्धशतक ठोकले. मलानने द. आफ्रिकेविरोधात नाबाद ९९ धावांची खेळी केली होती. ही खेळी त्याचे चाहते विसरू शकत नाहीत.
सामने - २२३
धावा - ६१७७
सरासरी - ३३.२४
स्ट्राईक रेट - १२८.६१
शतके - ५
अर्धशतके- ३५
सर्वोत्तम धावसंख्या - ११७