CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्सदरम्यान अचानक या क्रिकेटरने घेतली निवृत्ती

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 01, 2022 | 15:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

cricketer retirement: वेस्ट इंडिजची महिला क्रिकेट संघाच स्टार ऑलराऊंडर डिएंट्रा डॉटिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 

cricket
कॉमनवेल्थ गेम्सदरम्यान अचानक या क्रिकेटरने घेतली निवृत्ती 
थोडं पण कामाचं
  • डिएंड्रा डॉटिनने घेतली निवृत्ती
  • केले हे भावूक विधान
  • कॉमनवेल्थ गेम्सदरम्यान घेतली निवृत्ती

मुंबई: संपूर्ण क्रीडा जगतात(sports) सध्या कॉमनवेल्थ गेम्सची(commonwealth games) चर्चा सुरू आहेत. यातच वेस्ट इंडिजच्या(west indies) महिला क्रिकेट संघाची स्टार ऑलराऊंडर  डिएंट्रा डॉटिनने(Deandra Dottin) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तिने सांगितले की सध्याचे संघाची संस्कृती आणि वातावरण हे तिच्या करिअरसाठी पुढे नेणारे नाही. Deandra Dottin take retirement during commonwealth games 2022

अधिक वाचा - वंदे भारत ट्रेनमध्ये लागणार FRPच्या या खास सीट्स

डिएंड्रा डॉटिनने घेतली निवृत्ती

महिला टी-२० आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वात वेगवान सतक ठोकणारी ३१ वर्षीय डिएंड्रा डॉटिनने ट्विटरवरून आपली निवृत्ती जाहीर केली, तिने सांगितले की माझ्या क्रिकेट करिअरदरम्यान अनेक अडथळे आले जे मला दूर करावे लागले. मात्र संघाचे सध्याचे वातावरण माझ्या करिअरला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ते जिवंत ठेवण्यासाठी अनुकूल नाही. 

केले हे भावूक विधान

डिएंड्रा डॉटिनने सांगितले, खूप दुखाने तसेच पश्चातापाने मला असे वाटते की आता संघाची संस्कृती आणि तेथील वातारवणात राहण्यास मी सक्षम नाह कारण यामुळे माझ्या कामगिरीवर परिणाम होईल. 

कॉमनवेल्थ गेम्सदरम्यान घेतली निवृत्ती

डिएंड्रा डॉटिनने दरम्यान हे सांगितलेले नही की तिने बारबाडोसकडूनही निवृत्ती घेतली आहे. ती सध्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये बारबाडोसच प्रतिनिधित्व कर आहे. ती म्हणाली, की मी जगभरात डोमेस्टिक क्रिकेट खेळत राहीन. 

अधिक वाचा - रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा रिलेशनशीप

वेस्ट इंडिजला जिंकून दिले अनेक सामना

डॉटिन वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक सामने खेळणारी खेळाडू आहे. तिने २००८मध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने १२४ टी-२० आंतरराष्ट्रीय तसेच १४३ वनडे सामने खेळले. यात तिने ३०.५४च्या सरासरीने ३७२७ धावा केल्या. यात तीन शतकांचा समावेश आहे. तिच्या नावावर टी-२०मध्ये २६९७ धावा आहेत. यात दोन शतकांचा समावेश आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी