IND vs NZ: दीपक चाहर ने रोहित शर्मासोबत शेअर केला १५ वर्षे जुना फोटो, काही वेळातच झाला व्हायरल

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 19, 2021 | 18:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

deepak chahar: दीपक चाहरने इन्स्टाग्रामवर रोहित शर्मासोबतचा जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

chahar-rohit
दीपक चाहर ने रोहित शर्मासोबत शेअर केला १५ वर्षे जुना फोटो 
थोडं पण कामाचं
  • टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने गुरूवारी आपल्या इन्स्टाग्रामवर १५ वर्षे जुना फोटो शेअर केला.
  • या दीपक चाहरसोबत रोहित शर्मा दिसत आहे. 
  • चाहरने हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, १५ वर्षानंतर याच मैदानावर. मी आणि रोहित भय्या, त्यावेळेस आम्हाला दोघांनाही दाढी नव्हती

मुंबई: भारताने(india) न्यूझीलंडला(new zealand) तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात ५ विकेटनी हरवले. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामना रोमहर्षक झाला. रोहित शर्माला(rohit sharma) भारताचा नवा टी-२० कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने किवी संघाविरुद्ध विजयी सुरूवात केली. तसेच या सामन्यापासून टीम इंडियाला राहुल द्रविड(rahul dravid) मुख्य प्रशिक्षकही लाभला आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने(deepak chahar) गुरूवारी आपल्या इन्स्टाग्रामवर(instagram) १५ वर्षे जुना फोटो शेअर केला. या दीपक चाहरसोबत रोहित शर्मा(rohit sharma) दिसत आहे. 

चाहरने हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, १५ वर्षानंतर याच मैदानावर. मी आणि रोहित भय्या, त्यावेळेस आम्हाला दोघांनाही दाढी नव्हती. हा फोटो जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममधील आहे. सोशल मीडियावर हा फोटो काही वेळातच व्हायरल झाला. चाहते यावर जोरदार कमेंटबाजी करत आहेत. रोहित शर्माबाबत बोलायचे झाल्यास त्याने पहिल्या सामन्यात ४८ धावांची खेळी केली. दीपक चाहर बुधवारी किवी संघाविरुद्ध महागडा ठरला. त्याने ४ ओव्हरमध्ये ४२ धावा दिल्या तर केवळ एक विकेट मिळवला. 

बुधवारी पहिल्या टी-२० सामन्यात रोहित शर्माने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंड संघाने पहिल्यांदा फलंदाजी करतााना निर्धारित षटकांत २० ओव्हरमध्ये ६ बाद १६४ धावा केल्या. त्यांच्याकडून मार्टिन गप्टिलने सर्वाधिक ७० आणि मार्क चॅपमॅनने ६३ धावा केल्या. भुवनेश्वर कुमार आणि आर अश्विन यांनी सर्वाधिक २-२ विकेट मिळवल्या. १६५ धावांचे लक्ष्य टीम इंडियाला मिळाले. टीम इंडियाने हे आव्हान १९.४ ओव्हरमध्ये ५ विकेट गमावत पूर्ण केले. सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ६२ धावा केल्या. किवी संघाकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक २ विकेट मिळवल्या. 

न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक

  1. बुधवार १७ नोव्हेंबर २०२१ - पहिली टी २०, जयपूर - संध्याकाळी ७ वा. - भारत ५ विकेट राखून विजयी
  2. शुक्रवार १९ नोव्हेंबर २०२१ - दुसरी टी २०, रांची - संध्याकाळी ७ वा.
  3. रविवार २१ नोव्हेंबर २०२१ - तिसरी टी २०, कोलकाता - संध्याकाळी ७ वा.
  4. गुरुवार २५ नोव्हेंबर ते सोमवार २९ नोव्हेंबर २०२१ - पहिली टेस्ट, कानपूर - सकाळी ९.३० वा.
  5. शुक्रवार ३ डिसेंबर ते मंगळवार ७ डिसेंबर २०२१ - दुसरी टेस्ट, मुंबई - सकाळी ९.३० वा.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी