Deepak Hooda: दीपक हुड्डाने भारतासाठी बनवला हा खास रेकॉर्ड, जवळपासही नाहीत विराट-रोहित

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 19, 2022 | 11:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs Zimbabwe: भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्ध १० विकेटनी धमाकेदार विजय मिळवला. भारताकडून दीपक हुड्डाने एक मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला. 

deepak hooda
Deepak Hooda: दीपक हुड्डाने भारतासाठी बनवला हा खास रेकॉर्ड 
थोडं पण कामाचं
  • दीपक हुड्डाने डोमेस्टिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये कमाल दाखवली आहे.
  • याच कारणामुळे त्याला भारतीय संघात जागा मिळाली. हुड्डाने रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने पदार्पण केले.
  • दीपक हुड्डाने भारतासाठी आतापर्यंत १५ सामने खेळले आहेत आणि भारताने या सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवला.

मुंबई: भारतीय संघाने झिम्बाब्वेला(india vs zimbabwe) पहिल्या वनडे सामन्यात धमाकेदार पद्धतीने १० विकेटनी हरवले. या सामन्यात भारतीय गोलंदाज आणि सलामीच्या जोडीने कमालीची कामगिरी केली. भारताच्या समोर झिम्बाब्वेचा संघ टिकूच शकला नाही. झिम्बाब्वेचा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. भारताच्या दीपक हुड्डाने(deepak hooda) झिम्बाब्वेविरुद्ध सामना जिंकण्यासह एक मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला. Deepak hooda make new world record

अधिक वाचा - दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या घरावर CBIची धाड

दीपक हुडाच्या नावावर हा मोठा रेकॉर्ड

दीपक हुड्डाने डोमेस्टिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये कमाल दाखवली आहे. याच कारणामुळे त्याला भारतीय संघात जागा मिळाली. हुड्डाने रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने पदार्पण केले. दीपक हुड्डाने भारतासाठी आतापर्यंत १५ सामने खेळले आहेत आणि भारताने या सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवला. त्याने भारतासाठी जितके सामने खेळला आहेत त्या सर्व सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवला आहे. 

या रेकॉर्डशी बरोबरी

दीपक हड्डाने ज्या सामन्यात भारतीय संघासाठी खेळला आहे त्या सर्व सामन्यात भारताला विजय मिळवला आहे. वर्ल्ड रेकॉर्डबाबत बोलायचे झाल्यास रोमानियाचा क्रिकेटर सात्विक नादिगोतला अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू आहे. त्याने पहिल्या १५ सामन्यांत रोमानियाच्या संघाला विजय मिळाला होता. मात्र भारताच्या दीपक हुड्डाने या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. हुड्डाकडे हा रेकॉर्ड तोडण्याची संधी आहे. भारत आणि झिम्बाब्वेविरुद्ध दुसरा वनडे सामना २० ऑगस्टला खेळवला जाणार आहे. त्या सामन्यात भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार आहे. 

गोलंदाजी-फलंदाजी न करता बनवला रेकॉर्ड

दीपक हुड्डाला झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी करण्याची संघी मिळाली नाही. तसेच त्याने फिल्डिंगदरम्यानही एकही कॅच पकडला नाही मात्र असे असतानाही त्याने एक वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. दीपक हुड्डाने आतापर्यंत ६ वनडे आणि ९ टी-२० सामने खेळले आहेत. वनडेतील चार डावांमध्ये ११५ धावा त्याच्या नावावर आहेत. टी-२० क्रिकेटमध््ये ७ डावांत त्याने २७४ धावा केल्या आहेत. यात १०४ धावांच्या खेळीचा समावेश आहे. 

अधिक वाचा - घरात आर्थिक संकट असेल तर या दिवशी करा 'हे' उपाय

पहिल्या वनडेत जबरदस्त विजय

तब्बल ६ वर्षांनी झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर जबरदस्त कामगिरीचे प्रदर्शन करत विजय मिळवला. भारताने या सामन्यात १० विकेटनी विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करत असलेल्या झिम्बाब्वेला ५० षटकांत केवळ १८९ धावा करता आल्या होत्या. त्यामुळे हे माफक आव्हान पूर्ण करणे भारताला सहज शक्य झाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी