मुंबई: भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण(former cricketer irfan pathan) ऑलराऊंडर दीपक हुड्डाचे(deepak hooda) क्रिकेटप्रती असलेल्या प्रेमाची तुलना ही कँडी स्टोरमध्ये उभ्या असलेल्या मुलाशी करतो. त्याला केवळ क्रिकेटच्या मैदानावर खेळाचा भरपूर आनंद घ्यायचा आहे. भारताचा माजी ऑलराऊंडर पठाण म्हणाला, तो क्रिकेट खेळण्याचा भरपूर आनंद घेतो. हुड्डासाठी २०२१ हे वर्ष घटनाप्रधान राहिले. कर्णधार कृणाल पांड्यासोबत(krunal pandya) झालेल्या झटापटीनंतर त्याने बडोदा(team baroda) संघ सोडून दिला. मात्र त्याला ज्या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली त्याने त्यात जबरदस्त कामगिरी केली. आता त्याल वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या आगामी मालिकेसाठी पहिल्यांदा संघात सामील करण्यात आले आहे. deepak hooda selection in team india is like a movie story
या ऑलराऊंडर क्रिकेटरला २०१७मध्ये भारताच्या टी-२० संघात निवडण्यात आले होते मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. भारत सध्या मधल्या फळीतील ऑलराऊंडरच्या शोधात आहे अशातच या २६ वर्षीय खेळाडूला पुढील महिन्यांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. हुड्डासाठी गेले १२ महिने हे चढउताराचे राहिले. मात्र त्यानेआपल्या करिअरमधील वाईट काळातून बाहेर येण्यासाठी जबरदस्त मानसिक ताकद दाखवली.
अधिक वाचा - या व्यक्तींने सारा तेंडुलकरला जाहीरपणे मारली होती मिठी
छोट्या छोट्या संघांशी जोडले जाणाऱ्या बाहेरच्या खेळाडूंना सामन्याच्या फीव्यतिरिक्त इतर पैसेही दिले जातात. मात्र हुड्डासाठी पैसा महत्त्वाचा नव्हता आणि यासाठी त्याने कधीही राजस्थान क्रिकेट संघाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत बातचीत केली नाही. तो खेळाच्या मैदानावर परतण्यासाठी उत्सुक होता आणि राजस्थानलाही त्याच्यासारख्या चांगल्या खेळाडूची गरज होती. अशातच दोन्हींसाठी ही फायद्याचीच बाब होती.
राजस्थान क्रिकेट असोसिएशने सिव महेंदर शर्मा यांनी पीटीआयला सांगितले की, त्याला केवळ खेळायचे होते. त्याने कधीही पैशाबाबत विचारले नाही. आम्हाला माहीत होते की तो कोणत्या परिस्थितीतून गेला आहे. दोन्ही पक्षांसाठी हे फायद्याचे डील होते. आम्हाला त्याच्यासारख्या ऑलराऊंडरची गरज होती. आम्हाला आनंद आहे की त्याने आमच्याकडून खेळताना चांगली कामगिरी केली ज्यामुळे त्याला भारतीय संघात निवडण्यात आले.
हुड्डा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर होता. राजस्थानकडून खेळताना त्याची ही पहिली स्पर्धा होती. यानंतर विजय हजारे ट्रॉफीसाठी त्याला कर्णधार बनवण्यात आले. त्याने कर्नाटकविरुद्ध शतक ठोकले.
अधिक वाचा - गुगल करणार एअरटेलमध्ये गुंतवणूक
हुड्डासाठी मार्गदर्शक ठरलेल्या इरफान पठाणने सांगितले की ही खरी कहाणी आहे. अनेक संघांना त्याला घ्यायचे होते मात्र त्याला पैशाची चिंता नव्हती. त्याला मैदानावर उतरून खेळायचे होते आणि तो याच पद्धतीचा माणूस आहे. जेव्हा क्रिकेट खेळण्याची गोष्ट येते तेव्हा तो कँडी स्टोरमध्ये उभ्या असलेल्या मुलाप्रमाणे असतो.