IPL play off : दिल्लीने प्लेऑफमध्ये गमावले सर्वाधिक सामने, येथे पाहा आयपीएलच्या गोष्टी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 26, 2022 | 19:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. रोहित अँड कंपनीने सर्वाधिक पाच खिताब मिळवले आहेत. यानंतर चेन्नईने चार वेळा खिताब जिंकला आहे. 

ipl 2022
IPL play off : दिल्लीने प्लेऑफमध्ये गमावले सर्वाधिक सामने 
थोडं पण कामाचं
  • प्लेऑफमध्ये सर्वाधिक १५ सामने जिंकणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे.
  • प्लेऑफमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सुरेश रैना आघाडीवर आहे.
  • केवळ चार खेळाडूंना प्लेऑफच्या सामन्यांमध्ये शतक ठोकता आले

मुंबई: आयपीएल २०२२चा(ipl 2022) हंगाम आता संपत आला आहे.  या हंगामातील केवळ दोनच सामने बाकी राहिले आहेत. अशातच चाहत्यांच्या मनात प्लेऑफच्या(play off) रेकॉर्डशी संबंधित जाणून घेण्याची इच्छा असेल. जाणून घेऊया असे काही रेकॉर्ड्स...प्लेऑफमध्ये सर्वाधिक सामने चेन्नई सुपर किंग्सने(chennai super kings) जिंकले आहेत. त्यांनी १५ सामने जिंकले आहेत. दिल्ली कॅपिटल्सने(delhi capitals) सर्वाधिक ९ सामने गमावले आहेत. चेन्नईनेही ९ सामने गमावलेत. मात्र त्यांनी प्लेऑफमधील २४ सामने खेळले आहेत. Delhi capitals lost more matches in Ipl play offs matches

अधिक वाचा - बिहारची ही मुलगी एका पायावर 1 KM चा प्रवास करून जाते शाळेत

प्लेऑफमधील सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार

प्लेऑफमध्ये सर्वाधिक १५ सामने जिंकणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे. सोबतच सर्वाधिक पराभवाचा रेकॉर्डही त्याच्याच नावावर आहे. प्लेऑफमध्ये माही कर्णधार म्हणून ९ सामने हरला आहे. 

प्लेऑफमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज सुरेश रैना

प्लेऑफमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सुरेश रैना आघाडीवर आहे. त्याने २४ सामन्यांत ७१४ धावा केल्यात. या दरम्यानत्याने सर्वाधिक ५१ चौकार आणि ४० षटकार लगावलेत. 

प्लेऑफमधील शतके

केवळ चार खेळाडूंना प्लेऑफच्या सामन्यांमध्ये शतक ठोकता आले. ऋद्धिमन साहा, मुरली विजय, वीरेंद्र सेहवाग आणि शेन वॉटसन यांच्या नावावर ही शतके आहेत. 

अधिक वाचा -फिट राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स

प्लेऑफमध्ये सर्वाधिक विकेट्स

सर्वाधिक विकेट घेण्याबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये ड्वायेन ब्रावो आघाडीवर आहे. प्लेऑफमध्ये तो चेन्नई सुपर किग्स आणि गुजरात लायन्सकडून खेळताना २८ विकेट मिळवल्यात. 

आयपीएल २०२२ प्लेऑफ

राजस्थान रॉयल्स वि गुजरात टायटन्स - गुजरात टायटन्स विजयी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि लखनऊ सुपर जायंट्स - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विजयी

पुढील सामना

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि राजस्थान रॉयल्स 

फायनल सामना 

गुजरात टायटन्स वि आरसीबी-राजस्थान यांच्यातील विजेता संघ

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी