India vs Australia : ऑस्ट्रेलिया विरुद्धची नागपूर टेस्ट जिंकूनही भारताला 4 खेळाडूंची चिंता

Despite winning the Nagpur Test against Australia, India is worried about 4 players : नागपूरची टेस्ट मॅच भारताने 1 डाव आणि 132 धावांनी जिंकली. तिसऱ्याच दिवशी मॅचचा निकाल लागला. एवढे सगळे होऊनही भारताला टीममधील 4 खेळाडूंची चिंता सतावत आहे.

Despite winning the Nagpur Test against Australia, India is worried about 4 players
भारताची चिंता वाढवणारे 4 खेळाडू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • ऑस्ट्रेलिया विरुद्धची नागपूर टेस्ट जिंकूनही भारताला 4 खेळाडूंची चिंता
 • भारताची मधली फळी नागपूर टेस्टमध्ये पुरती अपयशी
 • भारताची चिंता वाढवणारे 4 खेळाडू

Despite winning the Nagpur Test against Australia, India is worried about 4 players : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 च्या (BORDER GAVASKAR TROPHY 2023) 4 टेस्ट मॅचमधील पहिली मॅच नागपूरमध्ये झाली. ही नागपूरची टेस्ट मॅच भारताने 1 डाव आणि 132 धावांनी जिंकली. तिसऱ्याच दिवशी मॅचचा निकाल लागला. भारताने दणदणीत विजय मिळवला. रवींद्र जडेजा मॅन ऑफ द मॅच झाला. एवढे सगळे होऊनही भारताला टीममधील 4 खेळाडूंची चिंता सतावत आहे.

भारताची मधली फळी नागपूर टेस्टमध्ये पुरती अपयशी ठरली. चेतेश्वर पुजारा (7 धावा), विराट कोहली (12 धावा), सूर्यकुमार यादव (8 धावा) हे खेळाडू अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरले. पण रोहित शर्मा (120 धावा), अक्षर पटेल (84 धावा), रवींद्र जडेजा (70 धावा), मोहम्मद शमी (37 धावा) या 4 खेळाडूंच्या जोरावर भारताने 400 धावा केल्या. मधल्या फळीला आलेली मोठे अपयश ही भारतासाठी चिंतेची बाब आहे.

भारताची चिंता वाढवणारे 4 खेळाडू

 1. केएल राहुल अर्थात लोकेश राहुल : नागपूर टेस्टच्या पहिल्या डावात 71 बॉल खेळून 20 धावा केल्या. वाईट पद्धतीने बाद झाला. मागील काही टेस्टमध्येही अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. 
 2. चेतेश्वर पुजारा : नागपूर टेस्टच्या पहिल्या डावात फक्त 7 धावा करू शकला. टेस्ट क्रिकेटसाठी बेस्ट म्हणून चेतेश्वरचा टीममध्ये समावेश झाला आहे. पण त्याच्याकडून अपेक्षित कामगिरी झालेली नाही. पुजाराच्या आधी आर. अश्विन मैदानात आला. अश्विनने 23 धावा केल्या. पण पुजारासारख्या अनुभवी खेळाडूला तेवढ्या धावा करणेही जमले नाही. 
 3. विराट कोहली : विराट कोहलीकडून भरपूर अपेक्षा होत्या. पण तो नागपूर टेस्टच्या पहिल्या डावात फक्त 12 धावा करू शकला. स्लीपमध्ये उभा असताना कोहलीने एक महत्वाचा कॅच सोडला. 
 4. सूर्यकुमार यादव : टी 20 आणि वन डे मध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे टेस्टमध्ये संधी देण्यात आली. पण नागपूर टेस्टच्या पहिल्या डावात फक्त 8 धावा करू शकला. वाईट पद्धतीने बाद झाला. 

सचिनची मुलगी सारा तेंडुलकर सध्या काय करतेय?

border-gavaskar trophy :बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 200 पेक्षा जास्त रन बनवणारे खेळाडू

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा

 1. गुरुवार 9 फेब्रुवारी 2023 ते सोमवार 13 फेब्रुवारी 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिली टेस्ट, विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम नागपूर - 1 डाव आणि 132 धावांनी भारताचा विजय
 2. शुक्रवार 17 फेब्रुवारी 2023 ते मंगळवार 21 फेब्रुवारी 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत दुसरी टेस्ट, अरुण जेटली स्टेडियम दिल्ली - सकाळी 9.30
 3. बुधवार 1 मार्च 2023 ते रविवार 5 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत तिसरी टेस्ट, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम धरमशाला - सकाळी 9.30
 4. गुरुवार 9 मार्च 2023 ते सोमवार 13 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत चौथी टेस्ट, नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद - सकाळी 9.30
 5. शुक्रवार 17 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिली वन डे, वानखेडे स्टेडियम मुंबई - दुपारी 2
 6. रविवार 19 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत दुसरी वन डे, डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए - व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम विशाखापट्टणम - दुपारी 2
 7. बुधवार 22 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत तिसरी वन डे, एमए चिदंबरम स्टेडियम चेन्नई - दुपारी 2

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी