Details about IPL 16, when and where to watch ipl 2023 opening ceremony : आयपीएल 2023 स्पर्धा (Indian Premier League : IPL, IPL 2023) शुक्रवार 31 मार्च 2023 पासून सुरू होत आहे. स्पर्धेची सुरुवात शुक्रवार 31 मार्च 2023 रोजी संध्याकाळी ओपनिंग सेरेमनीने होईल. ओपनिंग सेरेमनी संध्याकाळी सहा वाजता सुरू होणार आहे. या सोहळ्यात तमन्ना भाटिया परफॉर्म करणार आहे. हा सोहळा बघण्यासाठी अनेक मान्यवर, बीसीसीआयचे पदाधिकारी तसेच मोठा प्रेक्षकवर्ग उपस्थित असेल. यानंतर संध्याकाळी 7.30 वाजता स्पर्धेतील पहिली मॅच खेळवली जाईल.
आयपीएल 2023 ची ओपनिंग सेरेमनी गुजरातमध्ये अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. ओपनिंग सेरेमनी स्टार स्पोर्ट्स इंडिया आणि जिओ सिनेमा या दोन्ही ठिकाणी लाइव्ह दाखवली जाईल.
आयपीएलमध्ये तब्बल पाच वर्षांच्या गॅपनंतर ओपनिंग सेरेमनी होत आहे. याआधी 2018 मध्ये ओपनिंग सेरेमनी झाली होती. यानंतर 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या 40 जवानांना श्रद्धांजली म्हणून ओपनिंग सेरेमनी रद्द करण्यात आली. नंतर वारंवार कोरोना संकटामुळे ओपनिंग सेरेमनी रद्द करण्यात आली. यामुळे 2018 नंतर थेट 2023 मध्ये पाच वर्षांनंतर आयपीएलची ओपनिंग सेरेमनी होत आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये पहिली मॅच गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स ही आहे. ही मॅच शुक्रवार 31 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून सुरू होणार आहे. पहिली मॅच गुजरातमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी शनिवार 1 एप्रिल 2023 रोजी डबल हेडर आहे. एकाच दिवशी दोन मॅच होणार आहेत. यातली पहिली मॅच दुपारी 3.30 वाजता तर दुसरी मॅच संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. शनिवारची पहिली मॅच पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आणि दुसरी मॅच लखनऊ सपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स अशी आहे. यानंतर आयपीएल स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी रविवार 2 एप्रिल 2023 रोजी पुन्हा एकदा डबल हेडर आहे. पहिली मॅच दुपारी 3.30 वाजता तर दुसरी मॅच संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. रविवारी पहिली मॅच सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स अशी आहे. यानंतर दुसरी मॅच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स अशी आहे.
IPL 2023 मध्ये नाही खेळणार हे खेळाडू
IPL मधून चमकलेले भारतीय क्रिकेटपटू