मुंबई इंडियन्सच्या या स्टारची धमाल, ६ बॉलमध्ये ठोकले ५ सिक्स

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Sep 23, 2022 | 13:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Dewald Brevis 5 sixes in 6 balls: सीपीएलच्या सध्याच्या हंगामात आपली चमक दाखवण्यात अपयशी ठरलेल्या डेवाल्ड ब्रेविसने सलग पाच सिक्स ठोकत खळबळ उडवून दिली. 

dewald bravis
मुंबई इंडियन्सच्या या स्टारची धमाल, ६ बॉलमध्ये ठोकले ५ सिक्स 
थोडं पण कामाचं
  • डेवाल्ड ब्रेविसने गुरूवारी केली ६ बॉलमध्ये ३० धावांची खेळी
  • सेंड किट्स अँड नेविस पॅट्रियोट्सकडन खेळताना ६ बॉलमध्ये ठोकले ३० रन्स
  • युवराज सिहच्या अंदाजात ठोकले ५ सिक्स

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये(international cricket) बेबी एबी अशी ओळख बनवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेवाल्ड ब्रेविस(south africal cricketer devald bravis) सध्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये(CPL) सेंट किड्स अँड नेविस पॅट्रियोट्स संघाचा सदस्य आहे. गुरूवारी सीपीएलच्या एका सामन्यात ब्रेविसने त्रिनबागो नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात ६ बॉलमध्ये ५ सिक्स ठोकत खळबळ उडवून दिली. Devald bravis hits 5 six in 6 balls

अधिक वाचा - Diabetes रुग्ण पोटभर खाऊ शकतात सीताफळ, फक्त...

ही घटना गुरूवारी खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियोट्सच्या डावादरम्यान घडली. १९व्या आणि २०व्या  ओव्हरदरम्यान घडली. थोड्याच वेळात ही बातमी  आगीप्रमाणे सोशल मीडियावर पसरली. १८व्या ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी उतरलेल्या ब्रेविसने पहिल्या बॉलवर कोणतीच धाव घेतली नाही. त्याला दुसरा बॉल खेळण्याची संधी १९व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर मिळाली. अशातच डावखुरा स्पिन अकील हुसैनच्या बॉलवर ब्रेविसने सलग तीन सरळ सिक्स आणि मिड ऑन बाऊंड्रीच्या दिशेने ठोकले. 

अकीलला बनवले पहिला निशाणा

डावाच्या अखेरच्या ओव्हरमध्ये ब्रेविस फलंदाजीसाठी जेव्हा स्ट्राईकवर आला गोलंदाज डुपाविलॉन सलग दोन बॉलवर शरफेन रदरफोर्ट आणि रशीद खान यांची विकेट घेत हॅटट्रिकवर होता. अशातच ब्रेविसने त्याच्या गोलंदाजीविरोधात हल्लाबोल केला. आणि या ओव्हरच्या शेवटी दोन सलग सिक्स ठोकले. यामुळे त्यांचा संघ ६ बाद १६३ चा स्कोर उभा करण्यात यशस्वी ठरली. 

५००च्या स्ट्राईक रेटने केल्या धावा

ब्रेविसने आपल्या ६ बॉलच्या डावात ५ सिक्स ठोकले. त्याने ६ बॉलमध्ये ३० धावा केल्या. या डावादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट ५०० इतका होता. त्याच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर संघाला विजय मिळवता आला. ट्रिनबागो नाईट रायडर्सचा संघ २० ओव्हरमध्ये ७ बाद १५६ धावा करू शकला आणि सामना ७ धावांच्या अंतराने गमावला. 

अधिक वाचा - एसी लोकलमधील लगेज रॅक कोसळला, सुदैवाने कोणीही जखमी नाही

मुंबई इंडियन्सची मेहनत दाखवतेय रंग

डेवाल्ड ब्रेविस सध्या १९ वर्षांचा आहे. त्याने आयपीएलमध्ये ७ सामने खेळले आहेत. मुंबई इंडियन्स या खेळाडूला तपासत आहे. या संघासाठी खेळलेल्या सात सामन्यांत डेवाल्डने १४२च्या स्ट्राईकसह बॅटिंग केली होती. मुंबई इंडियन्सने त्याला आयपीएलनंतर काही ओव्हरसीज टूरही केले होते. त्यात त्याला आपल्या बॅटिंगमध्ये आणखी काही चांगले करण्याची संधी मिळाली होती. अशातच इंग्लंडमध्ये तो अर्जुन तेंडुलकरसोबत दिसला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी