cricket news: देवांश रायच्या  झंझावाती शतकाच्या जोरावर एसएम स्पोर्ट्स क्लब विजयी 

cricket stories : मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या दिवंगत राम बरन मेमोरियल प्रिमिअर लीग २०२१ स्पर्धेत  एसएम स्पोर्ट्स क्लब दादरच्या देवांश रायने ९१ चेंडूत झंझावाती ११९ धावांची खेळी केली आहे.  

 Devansh Rai's thunderous century SM Sports Club win in late ram bharan memorial trophy premier league
देवांश रायच्या  झंझावाती शतकाच्या जोरावर एसएम स्पोर्ट्स क्लब 
थोडं पण कामाचं
  • मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या दिवंगत राम बरन मेमोरियल प्रिमिअर लीग २०२१ स्पर्धेत  एसएम स्पोर्ट्स क्लब दादरच्या देवांश रायने ९१ चेंडूत झंझावाती ११९ धावांची खेळी केली आहे.  
  • अनिल जैसवाल यांनी आपल्या आजोबांच्या स्मृती प्रित्यर्थ आझाद मैदानावर अंडर १६ स्पर्धेचे आयोजन करतात.
  • प्रत्युतरादाखल मैदानात उतरलेल्या मीरा भाईंदर स्पोर्ट्स अकादमीचा संघ ३२.२ षटकात १११ धावात गारद झाला. 

cricket stories :  मुंबई :  मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या दिवंगत राम बरन मेमोरियल प्रिमिअर लीग २०२१ स्पर्धेत  एसएम स्पोर्ट्स क्लब दादरच्या देवांश रायने ९१ चेंडूत झंझावाती ११९ धावांची खेळी केली आहे.  

अनिल जैसवाल यांनी आपल्या आजोबांच्या स्मृती प्रित्यर्थ आझाद मैदानावर अंडर १६ स्पर्धेचे आयोजन करतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे या स्पर्धा झाल्या नाही. यावर्षी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने छोट्या स्पर्धा  सर्व मार्गदर्शक नियम पाळून घेण्याची परवानगी मिळाली. 

या स्पर्धेत २४ नोव्हेंबरला झालेल्या सामन्यात देवांश रायच्या ११९ धावांच्या खेळीच्या मदतीने एसएम स्पोर्ट्स क्लबने ३६.४ षटकात सर्वबाद २५१ धावांपर्यंत मजल मारली. देवांशने १७ चौकारांसह आपल्या डावाला आकार दिला. प्रत्युतरादाखल मैदानात उतरलेल्या मीरा भाईंदर स्पोर्ट्स अकादमीचा संघ ३२.२ षटकात १११ धावात गारद झाला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी