Yuzvendra chahal: धनश्रीने नावाच्या मागून हटवले चहल आडनाव, आता नवीन आयुष्य सुरू...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 18, 2022 | 13:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Yuzvendra Chahal: युझवेंद्र चहल सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो. त्याची पत्नी धनश्री वर्माही सोशल मीडिया क्वीन मानली जाते. यांची जोडी सगळ्यात सुपरहिट जोडींपैकी एक मानली जाते. मात्र आजकाल ही जोडी काही गोष्टींबाबत चर्चेत आहे. 

yuzvendra chahal and dhanashree verma
Yuzvendra chahal: धनश्रीने नावाच्या मागून हटवले चहल आडनाव 
थोडं पण कामाचं
  • अनेकदा आपल्या प्रेमाच्या पोस्ट अपडेट करत असणारी धनश्री आणि चहलची जोडी आजकाल दुसऱ्याच कारणामुळे चर्चेत आहे.
  • काही वेळेआधी धनश्री वर्माने इन्स्टाग्राम युजरनेममधून चहल हे आडनाव हटवले.
  • आधी इन्स्टाग्रामवर धनश्रीचे युझरनेम धनश्री वर्मा चहल असे होते.

मुंबई: टीम इंडियाचा स्पिनर युझवेंद्र चहल(team india spinner yuzvendra chahal) आपल्या जबरदस्त गोलंदाजीसाठी(bowling) ओळखला जातो. युझवेंद्र चहल सोशल मीडियावर(social media) मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असतो. त्याची पत्नी धनश्री वर्माही(dhanashree verma) सोशल मीडियावर सतत पोस्ट करत असते. त्यामुळे तिलाही सोशल मीडिया क्वीन म्हटले जाते. या दोघांची जोडी सुपरहिट जोडींपैकी एक मानली जाते. मात्र आजकाल ही जोडी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. चहल आणि धनश्रीच्या चाहत्यांना वाटतेय की आता या कपलमध्ये काही चांगले घडत नाही आहे. Dhanashree verma remove chahal surname from instagram

अधिक वाचा - पत्नीने पतीच्या प्रायव्हेट पार्टवर टाकलं उकळतं गरम पाणी

धनश्रीने हटवले चहल आडनाव

अनेकदा आपल्या प्रेमाच्या पोस्ट अपडेट करत असणारी धनश्री आणि चहलची जोडी आजकाल दुसऱ्याच कारणामुळे चर्चेत आहे. खरंतर काही वेळेआधी धनश्री वर्माने इन्स्टाग्राम युजरनेममधून चहल हे आडनाव हटवले. आधी इन्स्टाग्रामवर धनश्रीचे युझरनेम धनश्री वर्मा चहल असे होते. मात्र तिने अचानक तिच्या नावामागून चहल हटवल्याने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. असे का झाले याचा अंदाज कोणालाच लागत नाही आहे. मात्र चहल आणि धनश्री यांच्यात काही बिनसले असल्याची शक्यता चाहते व्यक्त करत आहेत. 

चहलच्या पोस्टने उभे केले सवाल

धनश्रीनंतर चहलच्या एका इन्स्टाग्राम पोस्टनेही सवाल उपस्थित केले आहेत. चहलने खरंतर एक स्टोरी लावली यात लिहिले होते की नवीन आयुष्य सुरू होत आहे. या पोस्टवरून चाहत्यांचे अनुमान आहे की या कपलमध्ये नक्कीच काहीतरी बिनसले आहे. दरम्यान, या जोडप्याकडून अद्याप याबाबत कोणतीही गोष्ट स्पष्ट झालेली नाही. मात्र येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे जरुर स्पष्ट होईल की या दोघांमध्ये काय सुरू आहे. 

अधिक वाचा - आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानी ड्रोनमधून आले शस्त्रास्त्र

अशी झाली होती भेट

युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांची पहिली भेट ऑनलाईन क्लासदरम्यान झाली होती. चहलने डान्स शिकण्यासाठी धनश्री वर्माचा क्लास जॉईन केला होता. इथूनच त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली होती. धनश्री वर्मा डान्स कोरिओग्राफर आणि एक डेंटिस्टही आहे. धनश्री वर्माचे डान्सशी संबंधित एक यूट्यूब चॅनेल आहे. या चॅनेलवर २६ लाखाहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. धनश्री बॉलिवूड गाण्यांना रिक्रिएट करते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी