Dhanashree-Yuzvendra : ..सध्या मी वेदना सहन करतेय, घरातही वावरताना त्रास होतोय; शेअर केली पोस्ट वाचा पूर्ण धनश्रीची पोस्ट कळेल सर्व प्रकरण

भारतीय क्रिकेटर (Indian cricketer) युझवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) पत्नी प्रसिद्ध युट्यूबर (YouTuber) आणि डान्सर (Dancer )धनश्री वर्मा (Dhanshree Verma) हिनं इन्स्टाग्राम (Instagram) प्रोफाइलवर एक पोस्ट करत आपल्या वादाविषयी भाष्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये धनश्री आणि युझवेंद्र यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.

Read Dhanshree's full shared post  post will know all the matter
धनश्रीला घरात वावरणही का झालं कठीण; जाणून घ्या काय आहे कारण  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • घटस्फोटोच्या चर्चा सुरू झाल्यानंतर युझवेंद्र आणि धनश्री दोघांनीही या सर्व अफवा असल्याचं म्हटलं
  • मिसेस चहलने तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवरुन 'चहल' हे आडनाव हटवल्यानं सोशल मीडियावर कल्लोळ.
  • डान्स करताना धनश्रीच्या पायाला दुखापत

मुंबई:  भारतीय क्रिकेटर (Indian cricketer) युझवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) पत्नी प्रसिद्ध युट्यूबर (YouTuber) आणि डान्सर (Dancer )धनश्री वर्मा (Dhanshree Verma) हिनं इन्स्टाग्राम (Instagram) प्रोफाइलवर एक पोस्ट करत आपल्या वादाविषयी भाष्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये धनश्री आणि युझवेंद्र यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. या वादाबाबत आणि बातम्यांवर स्वत: धनश्रीने आपल्या इन्स्टा पोस्टवर स्पष्टीकरण दिलं आहे. 

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असणाऱ्या धनश्रीच्या इन्स्टाग्रामवर तिचा नवरा युझवेंद्र चहलसोबतचे अनेक रोमँटिक फोटो आहे. मात्र दोन-तीन दिवसांपूर्वी मिसेस चहलने तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवरुन 'चहल' हे आडनाव हटवल्यानं सोशल मीडियावर शक्यता म्हणून वर्तवण्यात येत असलेल्या बातम्यांना विश्वासर्हता प्राप्त होऊ लागली.  युझवेंद्र आणि धनश्री याच्या घटस्फोटाच्या चर्चांनी वेग घेतला अन् सगळीकडे कल्लोळ माजला. 

Read Also : पाकिस्तान : माजी PM इमरान खान यांच्या अटकेची शक्यता

धनश्रीनं नावात बदल केल्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या. धनश्रीच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर केवळ 'धनश्री वर्मा' असं तिचं लग्नापुर्वीचं नाव ठेवलं. त्यामुळं युझवेंद्र आणि तिच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं गेलं. इतकंच नव्हे तर दोघांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्याच्या चर्चा सुरू होत्या.

Read Also : Maharashtra Monsoon Session : अधिवेशनाचा तिसरा दिवसही गाजणार

घटस्फोटोच्या चर्चा सुरू झाल्यानंतर युझवेंद्र आणि धनश्री दोघांनीही या सर्व अफवा असल्याचं म्हटलं होतं. मात्र बाकी काही बोलणं त्यांनी टाळलं होतं. त्यानंतरही चर्चा काही थांबल्या नाहीत. आता धनश्रीनंच लांबलचक पोस्ट शेअर करत या सगळ्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 

काय म्हटलंय धनश्रीनं तिच्या पोस्टमध्ये?

धनश्रीने तिच्या पोस्टमध्ये सांगितलं की, डान्स करताना तिच्या पायाला दुखापत झाली आहे. दुखापत गंभीर असल्यानं पुन्हा डान्स करायचा असेल तर शस्त्रक्रिया करावीच लागणार आहे. त्याशिवाय पर्याय नाही. आता पुढचे कित्येक महिने मला डान्स करता येणार नाही. त्यामुळं सध्या मी वेदना सहन करतेय. घरातही वावरताना त्रास होतोय. चर्चा ठरल्या त्रासदायक

पायाच्या दुखापतीमुळं आधीच मला खूप त्रास सहन करावा लागतोय. त्यात डान्स करता येणार नसल्यानं ते दु:ख आणखी जास्त आहे. असं असताना आमच्या नात्याबद्दल उलटसुटल चर्चा सुरू झाल्या, आणि या त्रासात आणखी भर पडली. धनश्री पुढं म्हणते, की या घटनेमुळं मी खूप काही शिकलेय. आता मी पहिल्यापेक्षा जास्त कणखर आणि समजूदार झालीय. या कठिण काळात माझा नवरा, कुटुंबिय माझ्या सोबत आहेत. यासगळ्यातून मी लवकरच बाहेर पडेन. असं ती म्हणाली आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी