धवनने चहलची बायको धनश्रीसोबत केला भांगडा, व्हायरल झाला व्हिडिओ

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Mar 31, 2021 | 17:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

शिखर धवनने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे यात तो आणि धनश्री भांगडा करताना दिसत आहे. या व्हिडिओला धनश्री वर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. 

shikhar dhawan
धवनने चहलची बायको धनश्रीसोबत केला भांगडा, व्हायरल व्हिडिओ 

थोडं पण कामाचं

  • युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा पेशाने डेंटिस्ट, कोरिओग्राफर आणि यूट्यूबर आहे.
  • हा व्हिडिओ धनश्रीनेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
  • धवनने इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत ९८ आणि ६७ धावांची खेळी केली होती. तो सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत दोन अर्धशतके ठोकणारा टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन(shikhar dhawan) मैदानात तसेच मैदानावर आपल्या फुल्ली एनर्जेटिक मूडसाठी ओळखला जातो. लॉकडाऊनदरम्यान धवनने अनेक व्हिडिओ(video) शेअर केले होते. यात तो कुटुंबियांसोबत डान्स करत होता. या स्टार फलंदाजाला जेव्हा टीम इंडियाचा स्पिनर युझवेंद्र चहलची(yuzvendra chahal) पत्नी धनश्री वर्मासोबत(dhanashree verma) डान्स करण्याची संधी मिळाली तेव्हा तो तिच्यासोबत चांगलाच थिरकला. 

शिखर धवनने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे यात तो आणि धनश्री भांगडा करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ धनश्रीनेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की गब्बर स्टाईलमध्ये भांगडा. एकत्र मिळून इन्स्टाग्राम रीलमध्येही आग लावली. जसे की मी आधीच सांगितले की एनर्जी बोलते. त्यांच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूपच आवडला. आतापर्यंत याला ३ लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 

युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा पेशाने डेंटिस्ट, कोरिओग्राफर आणि यूट्यूबर आहे. इंग्लंड सीरिजदरम्यान धनश्री युझवेंद्र चहलसोबत होती. चहल आणि धनश्री मोहम्मद सिराजसोबत मंगळवारी पुण्याच्या आरसीबीच्या कँपशी जोडले जाणार आहेत. 

धवनने इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत ९८ आणि ६७ धावांची खेळी केली होती. तो सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे आणि लवकरच तो दिल्ली कॅपिटल्सही जोडला जाणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा आयपीएलच्या १४व्या हंगामातील पहिला सामना १० एप्रिलला असणार आहे. त्यांचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्सविरोधात होणार आहे. टीम सध्या ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणार आहे. त्याला मंगळवारी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. नियमित कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्याने पंतची नियुक्ती करण्यात आली. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी