महेंद्र सिंग धोनी लपवले मोठे गुपीत, भारतीय लष्करालाही नाही येऊ दिली याची भनक 

आयसीसी वर्ल्ड कप २०१९ मध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात त्याच्या तोंडातून रक्त येत होते. 

Ms Dhoni
महेंद्रसिंग धोनी 

थोडं पण कामाचं

  • इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात धोनी झाला होता जखमी 
  • भारतीय लष्कराला आपली सेवा देत आहे धोनी 
  • धोनीच्या तोंडातून रक्त थुंकण्याचा फोटो झाला होता सोशल मीडियावर व्हायरल 

नवी दिल्ली :  टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी वर्ल्ड कप २०१९ दरम्यान आणि नंतर अनेक कारणांसाठी चर्चेत होता. वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात लक्ष्यचा पाठलाग करताना धोनीच्या रणनितीवर अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित झाले होते. या संदर्भात मोठी गोष्ट अशी की त्याच्या हाताच्या अंगठ्याला जखम झाली होती. तसे असताना तो फलंदाजी करत होता. त्यामुळे एका गटाना त्याचे कौतुक केले होते. 

मॅचमध्ये दरम्यान त्याच्या तोंडातून रक्त पडतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान, आता खुलासा झाला की माहीला या सामन्यात आणखी एका बोटाला जखम झाली होती. पण त्याने हे गुपीत कायम राखले. 

सध्या धोनी भारतीय लष्करात आपली सेवा देत आहे. तो दक्षिण काश्मीरच्या १०६ ए बटालियनसोबत आहे. स्वातंत्र्य दिनी तो लेहमध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय ध्वज फडकविणार आहे. यासाठी तो तयारी करत आहे. वर्ल्ड कप संपल्यानंतर अशी शक्यता वर्तविण्यात येत होती की धोनी आपल्या निवृत्तीची घोषणा करेल. पण ३८ वर्षीय धोनीने सर्वांना आर्श्चयचकीत करत दोन महिन्यांसाठी खेळातून ब्रेक घेतल भारतीय लष्कराला सेवा देण्याचे मन बनविले. 

एकीकडे धोनीच्या निवृत्तीबाबत सस्पेन्स असताना एका सूत्राने माहिती दिली की वर्ल्ड कप दरम्यान माहीला एका बोटाला जखम झाली होती. ती जखम त्याने स्कॅनही केली नाही. सूत्रांनी एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार भारत आणि इंग्लंड सामन्यात धोनीला ही जखम झाली होती. असे असताना त्याने खेळणं सुरू ठेवले. त्याची जखम इतकी गंभीर होती की त्याला हेअरलाइन फ्रॅक्चर आहे. हे इतके वेदनादायक होते की भारताच्या माजी कर्णधाराला मूठ बंद करणेही शक्य नव्हते. 

धोनीला ही गोष्ट ठेवली गुपीत... 

धोनीने आपल्या या जखमेबद्दल कमालीची गुप्तता राखली. या बाबत कोणालाच सांगितले नाही. या मागे कारण म्हणजे तो भारतीय लष्कराला आपली सेवा देऊ इच्छित होता. तो जखमेमुळे ट्रेनिंगमधून डिसक्वालिफाई होऊ इच्छित नव्हता. सूत्राने सांगितले की, धोनी आपल्या दुखापतीबाबत गुपीत राखत होता. याबाबत त्याने कोणालाही सांगितले नाही. त्याने या दुखापतीनंतर हाताचे स्कॅन केले नाही. कारण त्यामुळे पुन्हा अफवा उठू शकतात याची धोनीला भीती होती. तसेच दुखापतीमुळे तो ट्रेनिंगला अपात्र ठरला असता. 

जर ही बातमी खरी असेल तर धोनी लष्करात सेवा दिल्यानंतर आपल्या बोटाच्या दुखापतीचा इलाज करेल. त्यानंतर काही काळासाठी तो क्रिकेट अॅक्शनपासून दूर राहू शकतो. त्यामुळे आता पहावे लागेल एमएस दोनी मैदानात पुन्हा परत येणे योग्य समजतो. का तो आपल्या नेहमीच्या अंदाज अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
महेंद्र सिंग धोनी लपवले मोठे गुपीत, भारतीय लष्करालाही नाही येऊ दिली याची भनक  Description: आयसीसी वर्ल्ड कप २०१९ मध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात त्याच्या तोंडातून रक्त येत होते. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...