IPL: धोनी हेडनला म्हणाला होता, त्यासाठी मी काहीही देईन

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 29, 2021 | 20:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

Matthew Hayden's unique mongoose bat: मॅथ्यू हेडनची मुंगूस बॅट नक्कीच क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात असेल. आयपीएलमध्ये त्याने या बॅटने धमाल उडवून दिली होती. 

dhoni-hayden
IPL: धोनी हेडनला म्हणाला होता, त्यासाठी मी काहीही देईन 
थोडं पण कामाचं
  • मॅथ्यू हेडन आयपीएलमध्ये केवळ चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळला होता.
  • मॅथ्यू हेडन खेळत होता तेव्हा त्याची मुंगूस बॅट खूप फेमस झाली होती. 
  • सीएसकेचा कर्णधार एम धोनी त्या मुंगूस बॅटचा फॅन नव्हता.

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा(australia) धडाकेबाज माजी क्रिकेटर मॅथ्यू हेडन(mathew hayden) आज आपला ५०वा वाढिवस साजरा करत आहे. हेडनने आपल्या करिअरमध्ये अनेक खेळी केल्या. तसेच गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या आहेत. क्रिकेट चाहत्यांना आजही हेडनची ती खेळी नक्कीच आठवत असेल जी तो दिल्ली डेअरडेविल्सविरुद्ध खेळला होता. यावेळी त्याच्या बॅटमधून चक्क आग ओकत होती. dhoni says hayden i will give you  anything, please dont use this bat

या सामन्यात दिल्लीच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना वीरेंद्र सेहवागच्या ३८ बॉलमध्ये ७४ धावांच्या जोरावर ५ बाद १८५ धावा केल्या. दिल्लीच्या संघाविरुद्ध जेव्हा हेडनने फलंदाजी सुरू केली तेव्हा त्याने गोलंदाजांना जबरदस्त झोडण्यास सुरूवात केली. त्याने ४३ चेंडूत ९३ धावांची जबरदस्त खेळी केली तेव्हा हेडनपेक्षा त्याच्या मुंगूस बॅटचीच खूप चर्चा झाली. हेडनने या खेळीत एकूण ९ चौकार आणि ७ षटकार ठोकले होते. याशिवाय धोनीच्या अनुपस्थितीत नेतृत्व करणाऱ्या सुरेश रैनाने ३४ चेंडूत ४९ धावांची खेळी केली. चेन्नईने दिल्लीने दिलेले लक्ष्य १९.१ ओव्हरमध्ये पाच विकेटच्या नुकसानावर पूर्ण केले होते. 

असं म्हटलं जातं की या सामन्याआधी हेडन जेव्हा मुंगूस बॅटने खेळणार होता तेव्हा कर्णधार धोनीने त्यास असे करण्यास नकार दिला होता. दरम्यान, हेडनने दिल्लीविरुद्ध जबरदस्त खेळी करत कर्णधाराला खुश केले होते. एका मुलाखतीदरम्यान हेडनने याचा खुलासा केला होता. धोनीने हेडनला सल्ला दिला होता त्याने स्पर्धा सामन्यांमध्ये मुंगूस बॅटचा वापर करू नये. त्यावेळी धोनी हेडनला म्हणाला होता की मी तुला काहीही देईन. मात्र ही बॅट वापरू नका. प्लीज ही बॅट वापरू नको. 

हेडन आपल्या आयपीएल कारकिर्दीत चेन्नईशिवाय कधीच कोणत्या संघासोबत खेळला नाही. आयपीएलमध्ये तो ३२ सामने खेळला यात या क्रिकेटरने ११०७ धावा ेल्या. हेडनने  २००९मध्ये आयपीएलला ऑरेंज कॅपसह अलविदा म्हटले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी