Ind vs SA T20 : दिनेश कार्तिकने धोनीला टाकले मागे, द. आफ्रिकेविरुद्ध खेळताना रचला इतिहास

dinesh karthik becomes the oldest cricketer to score t20i fifty for india : दिनेश कार्तिकने नवा इतिहास रचला. तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये अर्धशतक करणारा सर्वाधिक वयाचा खेळाडू झाला.

dinesh karthik becomes the oldest cricketer to score t20i fifty for india
दिनेश कार्तिकने धोनीला टाकले मागे  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • दिनेश कार्तिकने धोनीला टाकले मागे
  • द. आफ्रिकेविरुद्ध खेळताना रचला इतिहास
  • भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये अर्धशतक करणारा सर्वाधिक वयाचा खेळाडू

dinesh karthik becomes the oldest cricketer to score t20i fifty for india : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी २० मालिका सुरू आहे. या मालिकेमधील चौथा सामना शुक्रवार १८ जून २०२२ रोजी झाली. यात दिनेश कार्तिकने २७ चेंडू खेळून नऊ चौकार आणि दोन षटकार मारत अर्धशतक केले. हे दिनेश कार्तिकचे आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमधील पहिले अर्धशतक आहे. ही कामगिरी करण्याच्या निमित्ताने दिनेश कार्तिकने नवा इतिहास रचला. तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये अर्धशतक करणारा सर्वाधिक वयाचा खेळाडू झाला. याआधी हा मान भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्याकडे होता. 

दिनेश कार्तिकने २०१७ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात ४८ धावा केल्या होत्या. ही त्याची आधीची आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी होती. ही कामगिरी मागे टाकत दिनेश कार्तिकने अर्धशतकी खेळी केली. दिनेश कार्तिकचा जन्म १ जून १९८५ रोजी झाला आणि याच वर्षी १ जून रोजी त्याने ३८व्या वर्षात पदार्पण केले.

दिनेश कार्तिकने धोनीला टाकले मागे

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊन अनेकदा अप्रतिम खेळी केल्या आहेत. धोनीने सहाव्या क्रमांकावर खेळून २०१८ मध्ये नाबाद ५२ धावांची एक खेळी केली होती. तर मनीष पांडेने २०२० मध्ये सहाव्या क्रमांकावर येऊन नाबाद ५० धावांची खेळी केली होती. दिनेश कार्तिकने सहाव्या क्रमांकावर येऊन ५५ धावांची खेळी केली.

दिनेश कार्तिकची कामगिरी

दिनेश कार्तिकने आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये ३६ सामन्यांतील ३० डावांमध्ये फलंदाजी केली. तो सोळा वेळा नाबाद राहिला. दिनेश कार्तिकने आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये आतापर्यंत ४९१ धावा केल्या. यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ५५ धावांची खेळी ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

दिनेश कार्तिकची खेळी

दिनेश कार्तिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात २७ चेंडू खेळून नऊ चौकार आणि दोन षटकार मारत ५५ धावा केल्या. या अर्धशतकाच्या जोरावर भारताने वीस षटकांत सहा बाद १६९ धावा केल्या. धावांचा पाठलाग करत असलेल्या दक्षिण आफ्रिकेचे सर्व खेळाडू १६.५ षटकांत ८७ धावा करून बाद झाले. भारताने सामना ८२ धावांनी जिंकला. यामुळे पाच टी २० सामन्यांच्या मालिकेत भारत आणि दक्षिण आफ्रिकेने प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. आता निर्णायक सामना बंगळुरू येथे रविवार १९ जून २०२२ रोजी होणार आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - पाच टी २० सामन्यांचा निकाल

  1. ९ जून २०२२ - पहिला सामना - दिल्ली - द. आफ्रिकेचा सात गडी राखून विजय
  2. १२ जून २०२२ - दुसरा सामना - कटक - द. आफ्रिकेचा चार गडी राखून विजय
  3. १४ जून २०२२ - तिसरा सामना - विशाखापट्टणम - भारताचा ४८ धावांनी विजय
  4. १७ जून २०२२ - चौथा सामना - राजकोट - भारताचा ८२ धावांनी विजय
  5. १९ जून २०२२ - पाचवा सामना - बंगळुरू - खेळायचा आहे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी