Team India: आधी लग्नात फसवणूक, नंतर संघातून बाहेर, आता दमदार पुनरागमन करतोय हा खेळाडू

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 01, 2022 | 18:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Dinesh Karthik Birthday: टीम इंडियाचा अनुभवी विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक आज आपला ३७वा वाढदिवस साजरा करत आहे. कार्तिकची ३ वर्षानंतर टीम इंडियामध्ये पुन्हा एंट्री होतेय. 

team india
Team India:आधी लग्नात फसवणूक, नंतर संघातून बाहेर, आता... 
थोडं पण कामाचं
  • दिनेश कार्तिकच्या पर्सनल लाईफबाबत बोलायचे झाल्यास भारतीय क्रिकेटमधील खेळाडू मुरली विजयसोबतचा त्याचा वाद काही लपून राहिलेला नाही.
  • खरंतर, कार्तिकचे पहिले लग्न निकिताशी झाले होते.
  • मात्र दोघांचे लग्न काही जास्त वर्षे टिकले नाही.

मुंबई: टीम इंडिया (Team India) ९ जूनपासून ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळत आहे. या संघात दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) लाही संधी मिळाली आहे. अनुभवी विकेटकीपर फलंदाज दिने कार्तिक आज १ जूनला आपला ३७वा वाढदिवस(birtday) साजरा करत आहे. कार्तिकचे खासगी आयुष्य हे त्याच्या प्रोफेशनल लाईफप्रमाणेच चढ-उताराने भरलेले राहिले आहे. आज त्याच्या पर्सनल लाईफबद्दल बोलणार आहोत. Dinesh karthik celebrate 37th birthday

अधिक वाचा - श्रीलंका दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघात कोरोनाचा शिरकाव 

आधी लग्नात फसवणूक

दिनेश कार्तिकच्या पर्सनल लाईफबाबत बोलायचे झाल्यास भारतीय क्रिकेटमधील खेळाडू मुरली विजयसोबतचा त्याचा वाद काही लपून राहिलेला नाही. खरंतर, कार्तिकचे पहिले लग्न निकिताशी झाले होते. मात्र दोघांचे लग्न काही जास्त वर्षे टिकले नाही. जेव्हा दिनेशने निकिताला घटस्फोट दिला तेव्हा ती प्रेग्नंट होती. घटस्फोट होताच निकिताने मुरली विजयशी लग्न केले होते. पत्नीने केलेल्या फसवणुकीमुळे कार्तिक खूपच बिथरला होता. मात्र त्यावेळेस त्याच्या आयुष्यात स्क्वॉश प्लेयर दीपिका पल्लिकलने एंट्री मारली होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Dinesh Karthik (@dk00019)
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Dinesh Karthik (@dk00019)

वाईट काळात दीपिकाने केला सपोर्ट

दिनेश कार्तिकच्या या वाईट काळात दीपिकाने त्याला खूप सपोर्ट केला. लवकरच दोघांनी साखरपुडा केला. ऑक्टोबर २०१४च्या इव्हेंटमध्ये दोघांनी सांगितले की ते २०१५मद्ये लग्न करू शकतात आणि असे झाले ही. दोघांनी २०१५मध्ये लग्न केले. दिनेश हिंदू आहे आणि दीपिका ख्रिश्चनत्यामुळे दोघांच्या पद्धतीने हे लग्न पार पडले. 

अधिक वाचा - लॉर्ड्स कसोटीकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, हे आहे प्रमुख कारण

आयपीएल २०२२मध्ये शानदार पुनरागमन

आयपीएल २०२२मध्ये दिनेश कार्तिक  रॉयल चैलेंजर्स बंगळुरू (RCB)संघात होता. दिनेश ३७ वर्षांचा झाला आहे. मात्र या वयातही तो आपल्या एनर्जीने युवा तरूणांना लाजवतोय. आयपीएल २०२२मध्ये दिनेश कार्तिकने १६ सामन्यांत ५५.००च्या सरासरीने ३३० धावा केल्या. त्याच्या शानदार कामगिरीमुळेच त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी