१५ वर्षांनंतर या खेळाडूची तपस्या फळाला, वर्ल्ड कपमध्ये खेळणार पहिला सामना

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jul 02, 2019 | 17:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

अखेर भारतीय क्रिकेट टीममधील एका खेळाडूला १५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेचे फळ मंगळवारी बर्मिंघममध्ये बांग्लादेश विरूद्धच्या सामन्यात मिळाले आहे. 

dinesh kartik
दिनेश कार्तिक  |  फोटो सौजन्य: Twitter

बर्मिंघम :  वर्ल्ड कप २०१९ मध्ये आपला अखेरचा सामना इंग्लंडविरूद्ध ३१ धावांनी गमावल्यानंतर टीम इंडियाने मंगळवारी बांग्लादेश विरूद्धच्या सामन्यात संघात दोन बदल केले. कर्णधार विराट कोहलीने चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आणि केदार जाधव यांना अंतिम ११ तून बाहेरचा रस्ता दाखविला. त्यांच्या जागी भुवनेश्वर कुमार आणि दिनेश कार्तिक यांना प्लेइंग ११ मध्ये सामील केले. याबरोबरच १५ वर्षांच्या प्रदीर्घ करिअरमध्ये दिनेश कार्तिकला पहिल्यांदा वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. 

दिनेश कार्तिकचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे करिअर खूप चढ उतारांचे राहिले आहे. सप्टेंबस २००४ मध्ये त्याने वनडे क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. या १५ वर्षात तो अनेक वेळा संघातून आत-बाहेर झाला. बहुतांशी काळ त्याला १५ सदस्यीय संघात सामील करण्यात आले पण त्याला नेहमी बेंचवरच बसावे लागले. त्याला जेव्हा पण संधी मिळाली ती एम एस धोनीचा बॅकअप म्हणून तो संघात होता. 

२००७ वर्ल्ड कपच्या संघात सामील 

वेस्ट इंडिजमध्ये २००७ मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये दिनेश कार्तिकला टीम इंडियात सामील करण्यात आले होते. त्यावेळी त्याची भूमिका रिझर्व किपर म्हणून होती. टीम इंडियाचा राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली सर्वात वाईट वर्ल्ड कप होता. भारतीय संघाला बांग्लादेश आणि श्रीलंकेने पराभूत करून पहिल्या राऊंडमध्ये मायदेशी धाडले होते. कार्तिक यामुळेही एकही मॅच न खेळता परतला होता. 


२०११ आणि २०१५ च्या वर्ल्ड कपमध्ये नाही मिळाली संधी 

यानंतर धोनीची जागा टीम इंडियामध्ये मजबूत होत गेली. अशात कार्तिकला २०११ मध्ये भारतातील आणि २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये सामील करण्यात आले नव्हते. पण २०१९ वर्ल्ड कप पूर्वी भारतीय टीमसमोर क्रमांक चारच्या खेळाडूच समस्या होती. त्यामुळे कार्तिकला धोनीचा बॅक म्हणून आणि क्रमांक चारचा फलंदाज म्हणून अंतीम १५ मध्ये सामील करण्यात आले. फिनिशर म्हणून कार्तिक टीमसाठी खूप उपयोगी होऊ शकतो. अशात त्याला यंदा अंतिम ११ मध्ये पहिल्यांदा संधी मिळाली आहे. 

धोनीच्या ३ महिने अगोदर झाला होता डेब्यू 

सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे कार्तिक याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू हा महेंद्रसिंग धोनीच्या ३ महिने अगोदर झाला आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक  मैदानावर इंग्लंड विरूद्ध त्याने आपल्या करिअरचा पहिला वन डे सामना खेळला होता. यात त्याने केवळ १ धाव केली होती. त्यानंतर १५ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये २०१५ आंतराष्ट्रीय वनडे सामन्यांनंतर त्याची तपस्या पूर्ण झाली. अखेर त्याला वर्ल्ड कपमध्ये सामना खेळण्याची संधी मिळाली. 


२०१५ वन डे सामन्यांतर स्वप्न झाले साकार 

डीकेने आपल्या वन डे करिअरमध्ये एकूण ९२ सामने खेळले आहेत. यातील ७७ डावात २१ वेळा नाबाद राहत ३१.०३ च्या सरासरी आणि ७३.७० च्या स्ट्राइक रेटने १७३८ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याच्या बॅटमधून ९ अर्धशतक निघाले आहेत. त्याचा सर्वाधिक स्कोअर ७९ आहे. हा त्याने ग्वालियरमध्ये २०१० मध्ये केला होता. या सामन्यात सचिन तेंडुलकरने इतिहासातील पहिले द्विशतक झळकावण्याचा कामगिरी केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
१५ वर्षांनंतर या खेळाडूची तपस्या फळाला, वर्ल्ड कपमध्ये खेळणार पहिला सामना Description: अखेर भारतीय क्रिकेट टीममधील एका खेळाडूला १५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेचे फळ मंगळवारी बर्मिंघममध्ये बांग्लादेश विरूद्धच्या सामन्यात मिळाले आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola