अॅडलेड: रोहित शर्माच्या(rohit sharma) नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ(indian cricket team) गुरूवारी अॅडलेडमध्ये(adleide) इंग्लंडविरुद्ध(india vs england) टी20 वर्ल्ड कप 2022च्या सेमीफायनलमध्ये(semifinal) खेळण्यास तयार आहे. टीम मॅनेजमेंटसमोर दिनेश कार्तिक(dinesh karthik) की ऋषभ पंत(rishabh pant) यांपैकी कोणाला संधी दिली जावी असा प्रश्न आहे मात्र चाहतेही याचे उत्तर जाणून घेण्यास उत्सुक आहेत.
अधिक वाचा - India vs England Live Score, T20 World Cup Semi Final: भारत वि. इंग्लंड सेमीफायनल थोड्याच वेळात
दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्यात कोण सेमीफायनलमध्ये खेळणार. याचे उत्तर देताना रोहितने सांगितले, ऋषभ पंत गेल्या सामन्यांमधी पहिला एकमेव खेळाडू होता ज्याला या दौऱ्यात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आम्हाला हवे होते की सेमीफायनलआधी त्याला थोडा मॅच टाईम मिळावा. असे यासाठी केले होते कारण जर तुम्हाला संघात एखादा बदल हवा असेल तर आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहेत. यामुळे सेमीफायनल आणि फायनलमध्ये बदल करू शकतो. जर आम्ही अचानक एखाद्या खेळाडूला आणून सरळ मॅचमध्ये खेळवले तर त्याच्यासोबत हा अन्याय होईल. त्या निर्णयामागे आमचा विचार होता.
रोहितने पुढे सांगितले, आम्ही सुरूवातीपासूनच सर्व खेळाडूंना तयार राहायला सांगितले आहे. त्यांना फायनल अथवा सेमीफायनल अथावा आणखी कोणताही सामना खेळण्याची संधी मिळू शकते. पंत आणि कार्तिकमध्ये कोणाला खेळवायचे आहे हा एक पॉलिसी निर्णय आहे की आम्ही सेमीफायनलमध्ये कोणत्या संघाविरुद्ध खेळत आहोत.
जर आम्ही उजव्या हाताच्या फलंदाजाला संधी देतो तर मधल्या ओव्हर्समध्ये आम्ही स्पिनर्सला काऊंटर करू शकतो. आम्हाला वाटते की ऋषभ आमच्यासाठी हे काम करू शकतो तर त्याला थोडा वेळ द्यावा लागेल. उद्या काय होईल हे आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत पण निश्चितपणे दोन्ही विकेटकीपर प्लेईंग 11च्या शर्यतीत सामील आहेत.
दिनेश कार्तिकने फिनिशर म्हणून टी20वर्ल्डकपमध्ये संघात स्थान मिळवले होते. त्याने सुरूवातीच्या लीग सामन्यात प्राथमिकता देण्यात आली होती मात्र तो फलंदाज म्हणून तितका यशस्वी ठरू शकला नाही. कार्तिक 4 सामन्याच्या तीन डावात फलंदाजी करतानना 4.66च्या सरासरीने एकूण 14 धावा करू शकला आहे. अशातच टीम मॅनेजमेंटला ऋषभ पंतकडे पाहावे लागले. मात्र पंतही झिम्बाब्वेविरुद्दच्या सामन्यात केवळ 3 धावांची खेळी करून बाद झाला होता.