Team india captain: १२ कर्णधारांच्या नेतृत्वात खेळलाय हा भारतीय क्रिकेटर, नाव ऐकून व्हाल हैराण

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 21, 2022 | 17:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

cricketer who played uder 12 captain: भारतीय संघाचा एक स्टार प्लेयर १२ कर्णधारांच्या नेतृत्वात खेळला आहे. हा खेळाडू विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. 

team india
१२ कर्णधारांच्या नेतृत्वात खेळलाय हा भारतीय क्रिकेटर 
थोडं पण कामाचं
  • दिनेश कार्तिकने आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरूवात राहुल द्रविडच्या नेतृत्वात केली होती
  • यानंतर त्याने वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्वात टी-२० मध्ये पदार्पण केले.
  • सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, ऋषभ पंत आणि अनिल कुंबळेच्या नेतृत्वात तो भारतासाठी खेळलाय.

मुंबई : भारतीय संघासाठी(Team india) खेळणे हे प्रत्येकाचे स्वप्न असत. मात्र फार कमी खेळाडूंना ही संधी मिळते. भारताचा(india) एक असा क्रिकेटर(cricketer) आहे जो १२ कर्णधाराच्या(captains) नेतृत्वात खेळला आहे. यात एका पाकिस्तानी खेळाडूचाही समावेश आहे. हा खेळाडू अद्याप भारताकडून खेळत आहे. जाणून घेऊया या खेळाडूबद्दल...(Dinesh Karthik played under 12 captains leadership)

अधिक वाचा - मराठी सिनेमा'ऑटोग्राफ'चा टीझर लॉन्च

दीर्घकाळानंतर केले पुनरागमन

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत दिनेश कार्तिकने दीर्घकाळानंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन केले. त्याने द. आफ्रिकेविरुद्ध चौथ्या टी-२० सामन्यात शानदार हाफसेंच्युरी ठोकली. ३७ वर्षीय दिनेश कार्तिक १२कर्णधारांच्या नेतृत्वात खेळला आहे. यात ११ भारतीय कर्णधार आणि एक पाकिस्तानी कर्णधाराचा समावेश आहे. दिनेश कार्तिकने २००४मध्ये टीम इंडियासाठी पुनरागमन केले होते. 

यांच्या नेतृत्वात खेळलाय कार्तिक

दिनेश कार्तिकने आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरूवात राहुल द्रविडच्या नेतृत्वात केली होती. यानंतर त्याने वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्वात टी-२० मध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, ऋषभ पंत आणि अनिल कुंबळेच्या नेतृत्वात तो भारतासाठी खेळलाय. तर आयसीसी इलेव्हनकडून खेळताना तो पाकिस्तानी क्रिकेटर शाहीद आफ्रिदीच्या नेतृत्वात खेळला आहे. आयर्लंड दौऱ्यावर तो हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातही खेळला आहे. 

अधिक वाचा - सोनिया गांधींची ईडी चौकशी, कार्यकर्त्यांनी कार पेटवली!

टी-२० वर्ल्डकप खेळण्यासाठी मोठा दावेदार

दिनेश कार्तिक चांगल्या फॉर्मात आहे. त्याच्या बॅटमधून खूप धावा निघत आहेत. आयपीएलमध्ये आरसीबीच्या संघाकडून खेळताना त्याने फिनिशरची भूमिका साकारली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धही तो भारतीय संघाला सामना जिंकून देण्यात यशस्वी ठरला होता. अशातच सिलेक्टर्स त्याला टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये सामील करू शकतात.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी