Dinesh Karthikच्या पत्नीने CWG 2022मध्ये जिंकले मेडल, क्रिकेटरने दिली ही प्रतिक्रिया

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 08, 2022 | 17:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

Commonwealth Games 2022: स्क्वॉशमध्ये भारताचा स्टार खेळाडू सौरव घोषाल आणि दीपिका पल्लिकल यांनी कॉमनवेल्थ गेम्स२०२२च्या मिक्स डबल्समध्ये ब्राँझ मेडल जिंकले आहे. यानंतर दीपिकाचा पती दिनेश कार्तिकने अतिशय शानदार पद्धतीने तिला शुभेच्छा दिल्या. 

deepika-sourav
Karthikच्या पत्नीने जिंकले मेडल, क्रिकेटरची ही प्रतिक्रिया 
थोडं पण कामाचं
  • दीपिका पल्लिकल आणि सौरव घोषालच्या जोडीने स्क्वॉशच्या मिक्स डबल्समध्ये ब्राँझ मेडल जिंकले.
  • कांस्यपदकासाठी खेळवण्यात आलेल्या सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाची जोडी लोब्बन डोना आणि पिले कॅमेरूनला २-० असे हरवले.
  • भारताचा सुपरस्टार विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकने २०१५मध्ये दीपिका पल्लिकलशी लग्न केले होते.

मुंबई: कॉमनवेल्थ गेम्समध्ये(commonwealth games) भारताचे खेळाडू अतिशय जबरदस्त कामगिरी करत आहेत. भारताचा स्टार खेळाडू सौरव घोषाल(souav ghoshal) आणि दीपिका पल्लिकलने(deepika pallikal) कॉमनवेल्थ गेम्सच्या मिक्स डबल्समध्ये ब्राँझ मेडल(bonze medal) मिळवले. सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या जोडीला तुफानी अंदाजात हरवले. आता दीपिका पल्लिकलने कॉमनवेल्थ गेम्समध्ये मेडल जिंकताच दिनेश कार्तिकने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. Dinesh karthik rection after his wife win bonze medal in squash at commonwealth games 2022

अधिक वाचा - 'या' बॉलिवूडच्या अभिनेत्रींचा जलवा, नववधूच्या लूकमध्ये दाखवल

स्क्वॉशमध्ये जिंकले पहिले मेडल

दीपिका पल्लिकल आणि सौरव घोषालच्या जोडीने स्क्वॉशच्या मिक्स डबल्समध्ये ब्राँझ मेडल जिंकले. कांस्यपदकासाठी खेळवण्यात आलेल्या सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाची जोडी लोब्बन डोना आणि पिले कॅमेरूनला २-० असे हरवले. दीपिका आणि सौरवकडे खूप अनुभव आहे. याचा फायदा त्यांना मिळाला. ऑस्ट्रेलियाच्या जोडीला त्यांनी ११-८, ११-४ अशी मात दिली. दीपिका पल्लिकल आणि सौरव घोषाल यांनी आपल्या जोरावर भारताला अनेक सामने जिंकून दिलेत. कॉमनवेल्थ गेम्स २०१८मध्ये दोघांनी सिल्व्हर मेडल्स मिळवले होते. 

दिनेश कार्तिकने दिली ही प्रतिक्रिया

भारताचा सुपरस्टार विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकने २०१५मध्ये दीपिका पल्लिकलशी लग्न केले होते. दोघांन हिंदू धर्म तसेच ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले होते. आता पत्नीनेमेडल जिंकताच कार्तिकने ट्विटरवर आपला आनंद व्यक्त केला. त्याने ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, तुझे प्रयत्न आणि मेहनत फळाला आली. तुम्हा दोघांचा खूप अभिमान वाटतो आणि आनंदही आहे. 

राष्ट्रपतींनी केले कौतुक

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकल्याबद्दल सौरव घोषाल आणि दीपिका पल्लिकल यांचे कौतुक केले. राष्ट्रपतींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले, कॉमनवेल्थ गेम्समध्ये स्क्वॉशच्या मिक्स इव्हेंटमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल दीपिका पल्लिकल आणि सौरव घोषालला शुभेच्छा. तुमचे पोडियम फिनिश भारतातील स्क्वॉश प्रेमींसाठी नक्कीच प्रेरणा असेल. अशा प्रकारचे विजय आपल्या देशातील खेळांची लोकप्रियता वाढवण्यासाठी प्रोत्साहन देतील. 

अधिक वाचा - मुख्यमंत्री कोण आहे हे कळतच नाही - आदित्य ठाकरे

स्क्वॉशमध्ये भारताचे दुसरे पदक

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचे स्क्वॉशमधील हे दुसरे पदक आहे. याआधी सौरव घोषालने मेन्स सिंगल्स इव्हेंटमध्ये कांस्यपदक मिळवले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी