मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या(indian premier league) हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून(royal challengers bangalore) खेळताना विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकने(dinesh karhik) शानदार केली होती. कार्तिकने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये फिनिशरची भूमिका साकारताना त्याने १८३.३३च्या स्ट्रार्क रेटने ३३० धावा केल्या होत्या. या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर कार्तिकला बऱ्याच वर्षांनी टीम इंडियात स्थान मिळाले. Dinesh karthik says about MS Dhoni
अधिक वाचा - कार्यालयावर हल्ला करणारे कार्यकर्ते पंकजा मुंडेंचे नाहीत
या अनुभवी विकेटकीपर-फलंदाज कार्तिकशी रविवारी बीसीसीआयने मजेदार बातचीत केली. या दरम्यान, कार्तिकने आपली आवड, तसेच आवडत्या खेळाडूबाबतही सांगितले.. दिनेश कार्तिकने सांगितले की जर त्याला मन वाचण्याची क्षमता मिळाली असती तर त्याने धोनीच्या डोक्यात काय चाललंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता.
Mountain ⛰️ or Beach 🏖️ — BCCI (@BCCI) June 12, 2022
Federer or Nadal 🤔
Tea 🫖 or Coffee ☕️
𝗧𝗵𝗶𝘀 𝗢𝗥 𝗧𝗵𝗮𝘁 - Do not miss this fun segment with @DineshKarthik! 😎 😎 #TeamIndia | #INDvSA | @Paytm pic.twitter.com/QHCsiLsLLq
कार्तिकने सांगितले की माझ्याकडे उडण्याची क्षमता असती तर मी अलास्काला उडत गेलो असतो. मी अलास्काबद्दल खूप काही चांगले ऐकले आहे. जर माझ्याकडे कोणाचा मेंदू वाचण्याची क्षमता असती तर मी धोनीच्या डोक्यात काय चाललंय हे वाचलं असते. कार्तिकने यावेळी चहा की कॉफी तर चहाला निवडले. तसेच तामिळनाडूच्या बाहेर जातो तेव्हा त्याला चहा पिण्याची खूपवेळा संधी मिळते.
रॉजर फेडरर की राफेल नदाल यांच्यापैकी कार्तिकने रॉजर फेडररला निवडले. कार्तिकने हे ही सांगितले की त्याला क्रिस्टियानो रोनाल्डोपेक्षा मेस्सीला बघणे जास्त आवडते. मला वाटते मेस्सी थोडासा वेगळा आहे आणि मी जे काही पाहिले आहे ते पाहायला मला आवडते. त्याने पुढे हे ही सांगितले की त्याला आपल्या सहकाऱ्यांसह मूव्ही नाईट्समध्ये टीम डिनर करायला आवडतो.
अधिक वाचा -
आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात त्याला बॅटिंग करण्याची जास्त संधी मिळाली नाही. मात्र दुसऱ्या टी-२०मध्ये त्याने २१ बॉलमध्ये ३० धावा ठोकल्या. यात २ चौकार आणि २ षटकार ठोकले. मात्र दुसऱ्या सामन्यात भारताला पुन्हा पराभव सहन करावा लागला. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारत २-०ने पिछाडीवर आहे.