IND vs SA: टीम इंडियामध्ये पुन्हा निवड झाल्यानंतर दिनेश म्हणाला असं काही...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 24, 2022 | 12:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

आयपीएलमध्ये एका फिनिशरच्या रूपात शानदार कामगिरीमुळे त्याला संघात पुन्हा स्थान देण्यात आले आहे. आरसीबीला दिनेश कार्तिकने प्लेऑफमध्ये क्वालिफाय करण्यात मदत केली. 

dinesh karthik
टीम इंडियामध्ये पुन्हा निवड झाल्यावर दिनेश म्हणाला असं काही. 
थोडं पण कामाचं
  • ट्विटरवर दिनेश कार्तिकने भारताच्या जर्सीमधील एक फोटो शेअर केला
  • तो २०१९मध्ये शेवटचा टीम इंडियासाठी खेळला होता.
  • त्याने आतापर्यंत २६ कसोटी, ९४ वनडे आणि ३२ टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे

मुंबई: भारताचा अनुभवी विकेटकीपर आणि फलंदाज दिनेश कार्तिकला(dinesh karthik) इंडियन प्रीमियर लीगमध्ये(indian premier league) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(royal challengers bangalore) संघासाठी शानदार कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध(south africa) आगामी पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी(t-20 series) भारतीय संघात निवडण्यात आले आहे. त्याने आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियामध्ये पुनरागमन केले आहे.Dinesh karthik tweet after selection in team india for t-20 series against south africa

अधिक वाचा - प्रेयसीसोबत संभोग करताना 61 वर्षीय प्रियकराचा मृत्यू

तो २०१९मध्ये शेवटचा टीम इंडियासाठी खेळला होता. आयपीएलमध्ये एका फिनिशरच्या रूपात शानदार कामगिरीमुळे त्याला संघात पुन्हा स्थान देण्यात आले आहे. आरसीबीला दिनेश कार्तिकने प्लेऑफमध्ये क्वालिफाय करण्यात मदत केली. 

ट्विटरवर दिनेश कार्तिकने भारताच्या जर्सीमधील एक फोटो शेअर केला आणि लिहिले, जर स्वत:वर विश्वास ठेवाल तर सर्व काही ठीक होईल. ३६ वर्षीय क्रिकेटरने म्हटले की सर्वांचा पाठिंबा आणि विश्वासासाठी धन्यवाद...कठोर मेहनत सुरू आहे. कार्तिक शेवटचा भारतासाठी २०१९मध्ये वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. यात भारतीयसंघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. 

त्याने आतापर्यंत २६ कसोटी, ९४ वनडे आणि ३२ टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर १०२५ कसोटी धावा, वनडेत १५७२ धावा आणि टी-२०मध्ये ३९९ धावा आहेत. कार्तिकने आयपीएल २०२२मध्ये आतापर्यंत १४ सामन्यांमध्ये १९१.३३च्या सरासरीने २८७ धाव केल्यात. त्याच्या फिनिशरच्या रूपाीतील कामगिरीमुळे आरसीबीला प्लेऑफ गाठता आली. आरसीबी पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेसाठी १८ सदस्यी संघाची घोषणा केली. 

अधिक वाचा -वजन कमी करण्यासाठी प्या ही ३ मसालेदार पेय

 SA T20I साठी भारतीय संघ : केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड़, ईशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उप कर्णधार) (विकेट कीपर), दिनेश कार्तिक (विकेट कीपर), हार्दिक पांड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी