मुंबई: भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने म्हटले आहे की, माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री खेळाडूंना विशेष कामगिरी करण्यासाठी प्रेरित करायचे पण अपयश सहन करू शकायचे नाहीत.
शास्त्री आणि कोहली यांचा कार्यकाळ भारतीय क्रिकेटसाठी नक्कीच चांगला होता. परंतु फॉर्म नसलेल्या खेळाडूंच्या पाठिशी ठामपणे उभे न राहिल्याबद्दल दोघांवरही अनेकदा टीका झाली आहे.
क्रिकबझच्या 'समर स्टेलेमेट' या कार्यक्रमात कार्तिक म्हणाला, "त्याला (शास्त्री) असे लोक आवडत नव्हते जे विशिष्ट वेगाने फलंदाजी करू शकत नाहीत किंवा नेटमध्ये काहीतरी वेगळे करायचे आणि सामन्यात काहीतरी वेगळे करायचे."
अधिक वाचा: टीम इंडियाच्या या खेळाडूला आशिया कपमधून बाहेर पाहून चाहते झाले खुश, बीसीसीआयला म्हणतायत Thank you
"त्याला ते आवडायचं नाही. संघाला काय हवे आहे आणि संघ कसा खेळायचे आहे हे त्याला माहीत होते. तो अपयश सहन करू शकायचा नाही. त्याने नेहमीच प्रत्येकाला चांगले खेळण्यासाठी प्रेरित करायचा.” 37 वर्षीय कार्तिक म्हणाला की, रोहित शर्मा आणि राहुल द्रविडच्या यांच्या कार्यकाळात तो अधिक आरामशीर आहे.
आशिया चषकासाठी दिनेश कार्तिकची संघात निवड
आशिया कप 2022 साठी भारतीय संघात दिनेश कार्तिकची निवड झाली आहे. यावेळी भारतीय संघ या स्पर्धेचं विजेतेपद पटकावेल अशी सगळ्या भारतीय क्रिकेट चाहत्यांना आशा आहे.
अधिक वाचा: Asia Cup: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी रोहितची मोठी खेळी
आशिया कप 2022 साठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि आवेश खान.
स्टँडबाय खेळाडू: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चहर.