मुंबई: क्रिकेट जगतात काही खेळाडू आपला रेकॉर्ड(record) बनवण्यामुळे चर्चेत राहतात काही खेळाडूंच्या विरुद्ध रेकॉर्ड बनल्याने ते चर्चेत राहतात. सध्या दिवसांत असे दोन भारतीय खेळाडू(indian player) आहेत ज्यांची क्रिकेट जगतात चर्चा सुरू आहे. ते खेळाडू आहेत ऋतुराज गायकवाड(ruturaj gaikwad) आणि शिवा सिंह. गायकवाडने एका ओव्हरमध्ये 43 धावा केल्याने त्याची चर्चा होत आहे तर शिवा सिंहने एका ओव्हरमध्ये 43 धावा दिल्याने त्याची चर्चा केली जात आहे. Do you know all about shiva singh?
अधिक वाचा - का साजरा केला जातो जागतिक एड्स दिन
ऋतुराजबाबत तर सगळेच जाणतात. मात्र शिवा सिंहबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. तो कोण आहे, कोणत्या संघाकडून खेळतो. कुठला आहे. आज आम्ही तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे देत आहोत.
शिवा सिंहचा जन्म उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये झाला होता. त्याने लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली होती. याच कारणामुळे वयाच्या 17व्या वर्षी त्याने 2018मध्ये झालेल्या अंडर 19 वर्ल्डकपमध्ये संघात स्थान मिळवले होते. त्याने संघाला वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका साकारली होती.
शिवाने त्या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सेमीफायनलमध्ये आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध फायनल सामन्यात शिवा सिंहने 2 विकेट मिळवत प्रतिस्पर्धी संघाचे कंबरडे तोडले होते आणि संघाला चॅम्पियन बनवले होते.
शिवा सिंह अंडर 19 वर्ल्डकपमध्ये आपल्या कामगिरीशिवाय 2018मध्ये तो 360 डिग्री अँगलने बॉलिंग करण्यामुळेही चर्चेत आला होता. त्याने सीके नायडू ट्रॉफीमध्ये यूपीकडून खेळताना 360 डिग्री चक्कर बॉल टाकला होता. अंपायरने हा बॉल डेड बॉल घोषित केला होता. यानंतर मोठा गदारोळ झाला होता. या बॉलवर युवराज सिंहपासून बिशन सिंह बेदी या दिग्गजांपर्यंत खेळाडूंनी यावर प्रतिक्रिया दिली होती. शिवा सिंह गोलंदाजी अॅक्शनवर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉननेही प्रतिक्रिया दिली होती आणि त्याने म्हटले होते की ही अॅक्शन त्याच्यानुसार योग्य आहे.
अधिक वाचा - ग्राहकांना दिलासा! आरबीआयने बँक लॉकरच्या नियमांत केला बदल
ऋतुराज गायकवाडने या सामन्यात 159 बॉलमध्ये नाबाद 220 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून 10 चौकार आणि 16 षटकार पाहायला मिळाले. ऋतुराजने स्पिनर शिवा सिंहच्या एका ओव्हरमध्ये 7 सिक्स ठोकले. यात एका नो बॉलचा समावेश होता.