महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत डॉली सैनीने मारली बाजी; पटकावले सुवर्ण पदक

भारताने 54 व्या आशियाई स्पर्धेत आपल्या पदके मिळवण्याची दौड सुरूच ठेवली आहे. काल 4 सुवर्णांसह 12 पदके जिंकणाऱ्या भारताने दुसऱ्या दिवशी एका सुवर्णासह चार पदके जिंकली. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत 55 किलो वजनी गटात डॉली सैनीने सुवर्ण पदक मिळवले.

Dolly Saini won gold medal in women's bodybuilding competition
महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत डॉली सैनीने मिळवलं सुवर्ण पदक  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आशियाई स्पर्धेच्या महिला गटाच्या सर्व लढती निसर्गरम्य क्रॉसरोड बेटावर झाल्या.
  • महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत 55 किलो वजनी गटात डॉली सैनीने सुवर्ण पदक मिळवले.
  • सीनियर महिलांच्या 155 सेमी उंचीच्या मॉडेल फिजीक प्रकारात भारताला चौथे पदक

माफुशी (मालदीव) : भारताने 54 व्या आशियाई स्पर्धेत आपल्या पदके मिळवण्याची दौड सुरूच ठेवली आहे. काल 4 सुवर्णांसह 12 पदके जिंकणाऱ्या भारताने दुसऱ्या दिवशी एका सुवर्णासह चार पदके जिंकली. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत 55 किलो वजनी गटात डॉली सैनीने सुवर्ण पदक मिळवले. तसेच ज्यूनियर महिलांच्या मॉडेल फिजीक प्रकारात सोलिमला जाजो हिने रौप्य पदकाला गवसणी घातली तर याच प्रकारात भाविका प्रधानने कांस्य मिळविले. 

महाराष्ट्राच्या इन्स्पेक्टरपाठोपाठ डॉक्टर मंजिरी भावसारनेही पदक विजेती कामगिरी केली. तिने मॉडेल फिजीक प्रकारात अत्यंत संघर्षमय लढतीत कांस्यपदक जिंकले. आज आशियाई स्पर्धेच्या महिला गटाच्या सर्व लढती निसर्गरम्य क्रॉसरोड बेटावर झाल्या. थायलंड, मंगोलिया आणि व्हिएतनामच्या महिला खेळाडूंचे भारतीय महिलांच्या गटावर पूर्णपणे वर्चस्व होते. या तिन्ही देशांचे खेळाडू प्रत्येक गटाच्या टॉप फाइव्हमध्ये असायचेच. त्यामुळे या तगड्या खेळाडूंपुढे भारतीय खेळाडूंचा निभाव लागणे शक्य नव्हते. तरीही भारताच्या महिलांनी जोरदार प्रयत्न केले. या बलाढ्य देशांपुढे भारताचे नाव उंचावले ते डॉली सैनीने. तिने थायलंड आणि व्हिएतनामच्या खेळाडूंना मागे टाकत भारताला दिवसातील एकमेव सुवर्ण पटकावून दिले. 

Read Also : रेल्वेने प्रवाशांसाठी सुरू केली नवी स्लीपिंग पॉड्सची सुविधा

ज्यूनियर महिलांच्या मॉडेल फिजीक प्रकारात भारतीयांची कामगिरी जोरात होती. या गटात टॉप फाइव्हमध्ये भारताच्या तीन खेळाडू होत्या, तरीही मंगोलियाच्या मुंगुनशगाई हिने गटाचे विजेतेपद पटकावले. भारताच्या सोलिमला जाजोला रौप्य तर भाविका प्रधानला कांस्य मिळाले. चौथा क्रमांकही भारताच्याच सोलन जाजोने मिळविला.  भारताला चौथे पदक मिळाले ते सीनियर महिलांच्या 155 सेमी उंचीच्या मॉडेल फिजीक प्रकारात.

Read Also : मोठी बातमी :NSE फोन टॅपिंग प्रकरण, संजय पांडेंना ईडीकडून अटक

या गटातही मंगोलियाची बदामखंड पहिली आणि थायलंडची किरीटिया चंतारत दुसरी आली. डॉ. मंजिरी भावसारने या गटात कांस्य जिंकून आपल्या पदकांची यादी आणखी वाढविली. या गटात मुंबईची निशरीन पारीख पाचवी आली. भारताच्या गीता सैनीने मात्र घोर निराशा केली. ती अव्वल पाच खेळाडूंमध्येही स्थान मिळवू शकली नाही.

bodybuilding

थायलंडच्या महिलांचा दबदबा

महिलांच्या गटात पुर्णपणे थाय महिलांचा दबदबा होता. त्यांनी महिलांच्या 21 गटांपैकी 5 गटात सुवर्ण आणि दोन रौप्य जिंकत सर्वाधिक 630 गुणांसह सांघिक विजेतेपद पटकावले तर व्हिएतनामने चार आणि मंगोलियाने तीन सुवर्ण जिंकत स्पर्धेत सांघिक उपविजेतापदाचा किताब मिळविला. अपामे व्हिएतनाम आणि मंगोलियाने 485 आणि 440 गुण मिळविले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी