द्रविड, कोहली, रोहितने यासाठी सोडली बिझनेस क्लास सीट्स- रिपोर्ट्स

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 08, 2022 | 11:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

Indian team management noble gesture: भारतीय टीम मॅनेजमेंटने टी20 वर्ल्‍ड कप दरम्यान चांगली भावना दाखवून दिली आहे. त्यांनी हे निश्चित केले की भारताच्या वेगवान गोलंदाजांना पुरेसा आराम मिळावा. त्यामुळे त्यांनी स्पर्धेदरम्यान फ्लाईटमध्ये बिझनेस क्लासची सीट्स उपलब्ध करून दिली. 

team
द्रविड, कोहली, रोहितने यासाठी सोडली बिझनेस क्लास सीट्स 
थोडं पण कामाचं
  • भारताने टी20 वर्ल्‍ड कपदरम्यान अनेक फ्लाईट्समध्ये केला प्रवास
  • भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळायचे आहे. 
  • भारताचा वेगवान गोलंदाजी आक्रमणाने सध्याच्या टी20 वर्ल्‍ड कपमध्ये केलीये चांगली कामगिरी

अॅडलेड: मेलबर्नपासून() ते सिडनी(), पर्थ(), अॅडलेड(). आणि आता परत मेलबर्नमध्ये परतणे त्यानंतर परत सेमीफायनलसाठी अॅडलेडला जाणे. यावरून स्पष्ट होते की भारतीय संघाचा() टी20 वर्ल्‍ड कपमधील() कार्यक्रम किती भरगच्च होता. केवळ सामने एकापाठोपाठ एक नव्हते तर त्यांना अनेकदा रस्ते प्रवासही करावा लागला. भारतीय संघाचे एकाच ठिकाणी दोन सामने नव्हते त्यामुळे त्यांचा बराचसा वेळ फ्लाईट्समध्ये प्रवास करण्यात गेला.. Dravid, Kohli, Rohit left his business class seats for faster bowler in world cup 

अधिक वाचा - ‘या’ चुकांमुळे तारुण्यातच कमकुवत होतात हाडं

खेळाडूंची रिकव्हरी पाहता हा प्रवास धोकादायक ठरू शकत होता. मात्र आपल्या वेगवान गोलंदाजाना जास्तीत जास्त आराम मिळावा यासाठी टीम मॅनेजमेंटने एक चांगली शक्कल लढवली. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार हेड कोच राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने आपल्या बिझनेस क्लासचे सीट्स वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्या. हा निर्णय यासाठी घेण्यात आला की वेगवान गोलंदाज आपले पाय पसरून आराम करू शकतील. 

भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफ सदस्यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना संगितले, स्पर्धेआधी आम्ही निर्णय घेतला होता की वेगवान गोलंदाजांना मैदानावर आणि मैदानाबाहेर मोठी मेहनत करावी लागले त्यामुळे त्यांना पाय पसरून आराम करण्याची गरज असते. हे पाहता हा निर्णय घेतण्यात आले. आयसीसीच्या नियमानुसार सर्व 16 संघासाठी फ्लाईटदरम्यान चार बिझनेस क्लीस देण्यात आल्या होत्या. साधारणपणे या सीट्स कर्णधार, कोच, टीम मॅनेजर आणि इतर वरिष्ठ खेळाडूंसाठी असतात. मात्र भारतीय टीम मॅनेजमेंटने निर्णय घेतला की संघाचा अतिरिक्त प्रवास पाहता वेगवान गोलंदाजांना लक्झरी सीट्स मिळायला हव्यात. 

भारतीय संघातील वेगवान गोलंदाजांनी स्पर्धेत आतापर्यंत धमाकेदार कामगिरी केली आहे. अर्शदीप सिंहने पहिल्याच वर्ल्डकपमध्ये प्रभावी कामगिरी करताना 10 विकेट मिळवल्या. हार्दिक पांड्याने आठ विकेट मिळवल्या तर मोहम्मद शमीने सहा विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमारने चार विकेट मिळवल्या. भारतीय संघ गुरूवारी सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. रोहित शर्मासह टीम मॅनेजमेंटला आशा आहे की त्यांचे वेगवान गोलंदाज पुन्हा एकदा कमालीचा खेळ करताना संघाला फायनलमध्ये पोहोचवतील. 

अधिक वाचा - सतत चिंतातूर असण्यामागे असतात ‘ही’ कारणं

इंंग्लंडविरुद्ध पारडे जड

टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. टी20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटबाबत विचार केला असता भारताचा इंग्लंडविरुद्ध रेकॉर्ड चांगला राहिला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत या फॉरमॅटमध्ये 22 सामने झाले यात 12 सामने टीम इंडियाने जिंकले तर 10 सामने इंग्लंड संघाने जिंकले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी