India Open 2022 : सात्विक-चिराग जोडीने जिंकली इंडियो ओपन २०२२

Duo of Satwik, Chirag win finals of India Open 2022 : सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने के. डी. जाधव स्टेडियममध्ये सुरू असलेल्या इंडिया ओपन २०२२ बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरीचा अंतिम सामना जिंकला.

Duo of Satwik, Chirag win finals of India Open 2022
सात्विक-चिराग जोडीने जिंकली इंडियो ओपन 
थोडं पण कामाचं
  • सात्विक-चिराग जोडीने जिंकली इंडियो ओपन
  • इंडिया ओपन २०२२ बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरीचा अंतिम सामना जिंकला
  • इंडिया ओपन २०२२ ही स्पर्धा बॅडमिंटनच्या वर्ल्ड टुर्नामेंटचा एक भाग

Duo of Satwik, Chirag win finals of India Open 2022 : नवी दिल्ली : सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने के. डी. जाधव स्टेडियममध्ये सुरू असलेल्या इंडिया ओपन २०२२ बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरीचा अंतिम सामना जिंकला. इंडिया ओपन २०२२ ही स्पर्धा बॅडमिंटनच्या वर्ल्ड टुर्नामेंटचा एक भाग आहे. यामुळे हा विजय सात्विक-चिराग या जोडीसाठी महत्त्वाचा आहे.

भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने इंडोनेशियाच्या मोहम्मद अहसान आणि हेंड्रा सेतियावान या जोडीचा २१-१६, २६-२४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. याआधी भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने उपांत्य फेरीत फ्रान्सच्या फैबियन डेलरू आणि विलियम विलेगर या जोडीचा पराभव केला होता.

बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिचे आव्हान महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत संपले. सिंधूला थायलंडच्या सुपनिदा कटेथोंगने १४-२१, २१-१३, १०-२१ असे हरवले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी