टीम इंडियाने सेंच्युरियनच्या मैदान मारल्यानंतर क्रिकेट जगताला धक्का, या स्टार खेळाडूचा कसोटी क्रिकेटला अलविदा

IND vs SA टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. मात्र या मालिकेच्या दरम्यान, एका धक्कादायक बातमीने संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का बसला आहे. वास्तविक या मालिकेच्या मध्यावर एका क्रिकेटपटूने निवृत्ती जाहीर केली आहे.

During the IND vs SA series, the star player surprised everyone by abruptly retiring from cricket
टीम इंडियाने सेंच्युरियनच्या मैदान मारल्यानंतर क्रिकेट जगताला धक्का, या स्टार खेळाडूचा कसोटी क्रिकेटला अलविदा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेत या खेळाडूची अचानक निवृत्ती
  • भारतीय संघाने या मालिकेतील पहिला कसोटी सामना 113 धावांनी जिंकला
  • भारताची 1-0 अशी आघाडी घेतली.

नवी दिल्ली : टीम इंडिया (team india) सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आहे. भारतीय संघाने या मालिकेतील पहिला कसोटी सामना 113 धावांनी जिंकला आणि 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र या मालिकेच्या मध्यभागी एका धक्कादायक बातमीने संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का बसला आहे. वास्तविक या मालिकेच्या मध्यावर एका क्रिकेटपटूने निवृत्ती जाहीर केली आहे. (During the IND vs SA series, the star player surprised everyone by abruptly retiring from cricket)

या क्रिकेटपटूने अचानक निवृत्ती 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेदरम्यान एका क्रिकेटपटूने कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. हा क्रिकेटपटू दुसरा कोणी नसून दक्षिण आफ्रिकेचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आहे. डी कॉकच्या या निर्णयाने संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. डी कॉक यावेळी त्याच्या कारकिर्दीतील सर्वात धोकादायक फॉर्ममध्ये होता आणि त्याच्या निर्णयाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

हे धक्कादायक कारण समोर आले

क्विंटन डी कॉकने निवृत्तीचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले असतानाच त्याने या निर्णयामागे एक मोठे कारणही सांगितले आहे. खरं तर, क्विंटन डी कॉकने त्याच्या वाढत्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्यासाठी तत्काळ कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली आहे. डी कॉकला भारताविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात पितृत्व रजेवर जायचे होते, परंतु त्याने या सर्वात मोठ्या फॉरमॅटमधून पूर्णपणे निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी, तो दक्षिण आफ्रिकेसाठी पांढऱ्या चेंडूचे क्रिकेट खेळण्यासाठी उपलब्ध आहे.

टीम इंडियाने इतिहास रचला

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या मैदानावर संपला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 113 धावांनी पराभव केला. सेंच्युरियनच्या मैदानावर पहिल्यांदाच भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत आफ्रिकन संघाचा पराभव केला आहे. या सामन्याच्या दुसऱ्या डावात 305 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 191 धावांवर गारद झाला. भारतीय संघ आता 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पुढे आहे.

गोलंदाज जिंकले

या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला दोन्ही डावात कमी धावसंख्येवर रोखले. या सामन्यात जसप्रीत बुमराहने अप्रतिम गोलंदाजी करताना तीन बळी घेतले. बुमराहशिवाय मोहम्मद शमीनेही ३ बळी घेतले. त्याचवेळी मोहम्मद सिराज आणि रविचंद्रन अश्विनने 2-2 विकेट घेतल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी