दुती चंदनं मोडला हा राष्ट्रीय रेकॉर्ड, कमरेच्या त्रासामुळे हिमा दास पिछाडीवर 

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 22, 2019 | 14:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

Dutee chand: २३ वर्षांच्या दुती चंदनं राष्ट्रीय रेकॉर्ड मोडीत काढला आहे. विशेष म्हणजे दुतीनं स्वतःचाच राष्ट्रीय रेकॉर्ड ब्रेक केला आहे. तर कमरेत दुखायला लागल्यानं हिमा दासला आपली स्पर्धा पूर्ण करता आली नाही.

hima das and dutee chand
द्युती चंदनं मोडला हा राष्ट्रीय रेकॉर्ड, कमरेच्या त्रासामुळे हिमा दास पिछाडीवर  

दोहा: धावपटू दुती चंदनं १०० मीटरचा स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक करत सेमीफायनलमध्ये आपली जागा मिळवली आहे. दोहा येथे आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा सुरू आहे. मात्र भारताला महिलांच्या ४०० मीटर शर्यतीला मुकावं लागलं आहे.  पाठीच्या त्रासांमुळे हिमा दासला आपली शर्यत पूर्ण करता आली नाही. दरम्यान भाला फेकची अॅथलेटिक्स अनुरानी आणि ५००० मीटरची धावपटू पारूल चौधरीनं आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपच्या पहिल्या दिवशी भारताला क्रमश: रौप्य आणि कांस्य पदक मिळवून दिलं आहे. 

२६ वर्षांच्या अनुनं ६०.२२ मीटर भाला फेकून रौप्य पदक मिळवलं. चीनच्या लियु हुइहुइनं ६५.८३ मीटर भाला फेकमध्ये सुवर्ण पदक मिळवलं. या स्पर्धेत भाग घेणारी अन्य भारतीय शर्मिला कुमारी ५४.४८ मीटर भाला फेकमध्ये सातव्या स्थानावर राहिली आहे. २४ वर्षीय पारूलनं महिलांच्या ५००० मीटर शर्यतीत १५ मिनिटं ३५.०३ सेकंदात धावून तिसरं स्थान मिळवलं. हे पारूल हिचं सर्वश्रेष्ठ व्यक्तिगत चांगलं प्रदर्शन आहे. या शर्यतीत सहभागी होणारी अन्य भारतीय संजीवनी जाधव( १५.४१.१२) चौथ्या स्थानावर आहे. 

बेहरीनची मुतिली विनफ्रेड यावी (१५.२८.८७) ला सुवर्ण आणि तिचीचं सहकारी बोंतु रेबितु (१५.२९.६०) ला रौप्य पदक मिळालं. सरिताबेन गायकवाड (५८.१७ सेकंद) आणि एम अर्पिता (५८.२० सेकंद) या महिलांनी ४०० मीटर शर्यतीत तर एम पी जाबिरनं पुरूषांच्या ४०० मीटर प्राथमिक फेरीच्या फायनलसाठी क्वॉलिफाय झाला. याआधी २३ वर्षांच्या दुतीनं ११.२८ सेकंद यावेळेत महिलांची १०० मीटर शर्यतीत सेमीफायनलमध्ये जागा निर्माण केली. दुतीनं यासोबतचं ११.२९ सेकदांचा आपला राष्ट्रीय रेकॉर्ड ब्रेक केला आहे. जो दुतीनं गेल्या वर्षी गुवाहाटीमध्ये बनवला होता. 

दरम्यन वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या क्वॉलिफिकेशन मार्क ११.२४ सेकंदापर्यंत दुती पोहचू शकली नाही. अन्य भारतीयांमध्ये जिंसन जॉन्सन (पुरूषांची ८०० मीटर), मोहम्मद अनस आणि राजीव अरोकिया (४०० मीटर), प्रवीण चित्रवेल (पुरूषांचं त्रिकूट), गोमती एम( महिलांची १५०० मीटर) यांनी पुढच्या फेरीत धडक मारली आहे. राष्ट्रीय रेकॉर्ड नोंदवणाऱ्या जॉन्सननं पुरूषांच्या ८०० मीटर शर्यतीत १.५३.४३ या वेळेत स्पर्धा पूर्ण केली. यावेळी तो कतारच्या जमाल हेयरेनच्या मागे राहिला. मनजीत सिंहच्या जागी टीममध्ये सहभागी केलेल्या मोहम्मद अफजल देखील सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. 

महिलांच्या ८०० मीटर शर्यतीत गोमतीनं २.०४.९६ चा वेळ घेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला. भारताची ट्विंकल चौधरी चौथ्या स्थानावर राहून देखील क्वॉलिफाय नाही झाली. अरोकिया ४०० मीटरच्या हिटमध्ये ४६.२५ च्या टायमिंगसोबत सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. तर अनसनं ४६.४६ सेकंदांचा वेळ घेत तिसरं स्थान पटकावलं आहे. पुरूषांच्या त्रिकूटात चित्रावेल ९व्या स्थानावर आहे. हिमा दास कमरेत त्रास जाणवत असल्यानं ४०० मीटरची स्पर्धा पूर्ण करू शकली नाही. भारताची एम आर पूवम्मा दुसऱ्या स्थानावर राहून फायनलमध्ये जागा बनवली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दुती चंदनं मोडला हा राष्ट्रीय रेकॉर्ड, कमरेच्या त्रासामुळे हिमा दास पिछाडीवर  Description: Dutee chand: २३ वर्षांच्या दुती चंदनं राष्ट्रीय रेकॉर्ड मोडीत काढला आहे. विशेष म्हणजे दुतीनं स्वतःचाच राष्ट्रीय रेकॉर्ड ब्रेक केला आहे. तर कमरेत दुखायला लागल्यानं हिमा दासला आपली स्पर्धा पूर्ण करता आली नाही.
Loading...
Loading...
Loading...